Rajyasabha Election : कोरोना होऊनही फडणवीस म्हणतात “मै झुकेगा नहीं”, अश्विनी वैष्णव यांच्यासोबतच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थिती

कोरोनाची लागण तरी राज्यसभा निवडणुकांसाठी फडणवीस एक्शन मोडमध्ये आहेत, अश्विनी वैष्णव यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली आहे.

Rajyasabha Election : कोरोना होऊनही फडणवीस म्हणतात मै झुकेगा नहीं, अश्विनी वैष्णव यांच्यासोबतच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थिती
कोरोना होऊनही फडणवीस म्हणतात "मै झुकेगा नहीं", अश्विनी वैष्णव यांच्यासोबतच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थितीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 5:28 PM

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुका (Rajyasabha Election) या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मतदानाला (Voting) अवघे काही दिवस उरले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात असल्याने आता हा पेच आणखी वाढला आहे. ही निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे. कारण सहाव्या जागेसाठी शिवसेने संजय पवार यांना मैदानात उतवले आहे. तर भाजपने कोल्हापुरातूनच धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि भाजप असा दोन्ही बाजुंनी होतोय. त्यातच भाजपसाठी एक मोठी अडचण झाली जेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पुन्हा कोरोना झाल्याची बातमी समोर आली. मात्र अशा परिस्थितीतही फडणवीस मागे हटले नाहीत. कोरोनाची लागण तरी राज्यसभा निवडणुकांसाठी फडणवीस एक्शन मोडमध्ये आहेत, अश्विनी वैष्णव यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली आहे.

कोरोना झाल्याची फडणवीसांची ट्विटरवरून माहिती

मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे आणि होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचण्या करून घ्याव्यात आणि काळजी घ्यावी, असे ट्विट फडणवीस यांच्याकडून करण्यात आले आहे.

फडणवीसांचं ट्विट

काँंग्रेसकडून खरगेंना महाराष्ट्राची जबाबदारी

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले प्रभारी नेमले आहेत. त्यात महाराष्ट्राची जबाबदारी काँग्रेसने खरगे यांना दिली आहे. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर करणे आणि निवडणूक सुरळीत पार पाडणे हे त्यांच्यासमोरचं आव्हान असणार आहे. तर सहावी जागा आपल्या गोटात यावी यासाठी भाजप आणि शिवसेना जोर लावत आहे. त्यासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी अश्विनी वैष्णव हे सध्या नेत्यांच्या रॅपिड बैठका घेत आहेत. सध्याच्या परिस्थिचा आढावा जाणून घेत आहेत. तर भाजपच्या नेत्यांकडून अपक्ष आमदार आणि इतर छोट्या पक्षांशी संपर्क साधण्यास सुरू आहे. कारण सहाव्या उमेदवाराचं भवितव्य आता त्यांच्याच हातात असणार आहे. शिवसेनाही छोट्या पक्षांशी चर्चा करत आहे. नाराज असलेले बहुजन विकास आघाडीचे आमदार हिंतेंद्र ठाकूर यांची आजच शिवसेनेच्या नेत्यांनीही भेट घेतली आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.