AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दलित भिकारी नाहीत, तर शिकारी आहेत : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

दलित भिकारी नाहीत, तर शिकारी आहेत, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय.

दलित भिकारी नाहीत, तर शिकारी आहेत : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री
| Updated on: Apr 13, 2021 | 4:57 PM
Share

मुंबई : दलित भिकारी नाहीत, तर शिकारी आहेत, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील कूचबिहारी भागात झालेल्या हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. या हिंसाचारात 4 जणांना आपले प्राण गमवावे लागले. यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आरामबाग विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या सुजाता मंडल यांच्यावर अनुसूचित जातीबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे. यावरुन त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. आठवलेंनी देखील ट्विट करत सुजाता मंडल यांच्यावर टीका केलीय (Ramdas Athawale criticize TMC leader Sujata Mandal over SC community remark in West Bengal).

रामदास आठवले म्हणाले, “दलित भिकारी नाही, तर दलित आता शिकारी आहेत. जे दलितांना भिकारी म्हणतात तेच भिकारी आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सुजाता मंडल यांनी दलितांबद्दल अपशब्द काढल्याबद्दल त्यांचा तीव्र निषेध” व्यक्त करतो.”

पश्चिम बंगाल मधील आरामबाग विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या सुजाता मंडल यांनी अनुसूचित जातीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. याबाबत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सुद्धा निवडणूक आयोगाची भेट घेऊन सुजाता मंडल यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

काय म्हणाल्या होत्या सुजाता मंडल

“अनुसूचित जातीतील लोक स्वभावाने भिकारी राहतात. ममता बनर्जी यांनी त्यांच्यासाठी खूप सारं केलं. मात्र, फार थोड्या पैशांसाठी ते भाजपला आपले मतदान विकत आहेत”, असं वादग्रस्त विधान सुजाता मंडल यांनी केलंय.

6 एप्रिल रोजी सुजाता मंडल यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मास्क लावलेल्या काही जणांनी माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला होता. त्यांनी त्यावेळी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. सुजाता मंडल डिसेंबर 2020 मध्ये भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला होता.

हेही वाचा :

मेरा राजा बेटा… हेलिकॉप्टर प्रवासात रामदास आठवलेंकडून मुलाचे फोटोसेशन

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस ठरवतील, तोपर्यंतच ठाकरे सरकार चालेल”

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आठवले म्हणतात, राज्य सरकार गलथान, 5 लाख लसी फुकट घालवल्या

व्हिडीओ पाहा :

Ramdas Athawale criticize TMC leader Sujata Mandal over SC community remark in West Bengal

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.