मुंबईतील पहिला ऑक्सिजन प्रकल्प सुरू; गोवंडीच्या ‘शताब्दी’त ऑक्सिजन जनरेटर युनिट कार्यान्वित

खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे.

मुंबईतील पहिला ऑक्सिजन प्रकल्प सुरू; गोवंडीच्या 'शताब्दी'त ऑक्सिजन जनरेटर युनिट कार्यान्वित
oxygen generator unit
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jun 19, 2021 | 6:07 PM

मुंबई : खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे. सीएसआर च्या माध्यमातून रुग्णालयात नव्याने कार्यान्वित झालेला हा मुंबईतील पहिला ऑक्सिजन प्रकल्प आहे. आरसीएफच्या सीएअसार निधीतून उभारण्यात आलेल्या या युनिटचे लोकार्पण करताना खासदार राहुल शेवाळे यांच्यासह विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार प्रकाश फातर्पेकर, आरसीएफचे शेषाद्री, मनपा सहाय्यक आयुक्त उबाळे, कामिनी राहुल शेवाळे, विभागातील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. (RCF CSR fund operates oxygen generator unit at Shatabdi Hospital, Govandi)

कोरोना संकटाचा सामना करताना महाराष्ट्रात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन ऑक्सिजन’च्या माध्यमातून राज्याला ऑक्सिजन पुरावठ्याबाबत स्वयंपूर्ण करण्याचे सूतोवाच केले होते. खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात आरसीएफ, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएआरसी यांसारख्या आस्थापनांना ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आरसीएफ कंपनीच्या सीएसआर निधीतून गोवंडीच्या पं. मदनमोहन मालविय शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर युनिट उभारण्यात आले.

या ऑक्सिजन जनरेटर युनिटद्वारे दिवसाला 9 किलो क्षमतेचे सुमारे 102 ऑक्सिजन सिलेंडर्स भरू शकतील इतक्या ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे शताब्दीसह पूर्व उपनगरातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या तुटवड्याची समस्या सुटू शकेल.

पूर्व उपनगरातील रुग्णालयांना दिलासा

याबाबत राहुल शेवाळे म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजनअभावी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी मी केलेल्या आवाहनाला आरसीएफकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या ऑक्सिजन युनिटमुळे पूर्व उपनगरातील रुग्णालयांना दिलासा मिळणार आहे. अशाच रीतीने बीपीसीएल, एचपीसीएल, बीएआरसी च्या मदतीने दक्षिण-मध्य मुंबईतून ऑक्सिजन तुटवड्याची समस्या हद्दपार करण्याचा आमचा मानस आहे.

इतर बातम्या

यापुढे दिल्लीच्या तख्तासंदर्भात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल; संजय राऊत यांचं मोठं विधान

‘आम्हाला एकटंच लढू द्या, 2024 ला राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान व्हायला पाहिजे’

(RCF CSR fund operates oxygen generator unit at Shatabdi Hospital, Govandi)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें