NCP : रुपाली ठोंबरे पक्षातूनच साईडलाईन? आता या यादीतूनही पत्ता कट, राष्ट्रवादीची लाडकी बहीण कोण यावर शिक्कामोर्तब
NCP Rupali Thombre : अजितदादांच्या राष्ट्रवादीत दोन रुपाली ताईंचा वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. हा वादा आताच नाही तर पक्षात प्रवेश दिल्यापासूनचा आहे. आता अजून एक अपडेट समोर येत आहे. रुपाली ठोंबरे यांना पक्षाने साईडलाईन केल्याचे समोर आलं आहे.

Ajit Pawar NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीतील महिला गटातील दोन ताईंचा वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला. पक्षातीलच दोन महिलांमधील ही जुगलबंदी अजितदादांची डोकेदुखी ठरत आहे. रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातील वाद गेल्या काही दिवसात प्रकर्षाने समोर आले आहे. याप्रकरणी पक्षाने रुपाली ठोंबरे यांना नोटीस बजावली असून त्यांना म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तर येत्या दोन दिवसात आपण भूमिका मांडणार असल्याचे त्या म्हणाल्या. काल त्यांनी अजितदादांची भेटही घेतली. तर आता एक अपडेट समोर येत आहे. रुपाली ठोंबरे यांना पक्षाने साईडलाईन केल्याचे समोर आलं आहे.
रुपाली ठोंबरे यांचे नाव नाही
रूपाली ठोंबरे यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत नाही. काही दिवस आधी ठोंबरे यांना प्रवक्ते यादीतूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तर आता रूपाली ठोंबरे यांना स्टार प्रचारक यादीत स्थान दिले नाही. अजित पवार, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे यांसह अमोल मिटकरी यांचे ही नाव स्टार प्रचारक यादीत आहे. आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात रुपाली ठोंबरे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
४० जणांमध्ये अनेक दिग्गज
आगामी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह अनेकांची नावं आहेत.
रुपाली चाकणकर या स्टार प्रचारक
या यादीत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, प्रतिभा शिंदे यांचा समावेश या यादीत आहे. तर स्टार प्रचारकांच्या यादीतून रुपाली ठोंबरे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील – चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक, नेते सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, महेश शिंदे, नजीब मुल्ला,विकास पासलकर आदींचा समावेश या स्टार प्रचारकांच्या यादीत आहे.
