हिरेन, वाझे सीएसएमटीला भेटले होते; एनआयएच्या तपासात मोठा खुलासा

मनसुख हिरेन आणि सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे 17 फेब्रुवारी रोजी सीएसएमटीला जीपीओजवळ भेटल्याची माहिती उघड झाली आहे. (sachin vaze met mansukh hiren in fort area, nia sources)

हिरेन, वाझे सीएसएमटीला भेटले होते; एनआयएच्या तपासात मोठा खुलासा
sachin vaze -mansukh
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 10:33 AM

मुंबई: मनसुख हिरेन आणि सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे 17 फेब्रुवारी रोजी सीएसएमटीला जीपीओजवळ भेटल्याची माहिती उघड झाली आहे. यावेळी दोघांनीही दहा मिनिटे चर्चा केली. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात असून त्या अनुषंगाने एनआयए तपास करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (sachin vaze met mansukh hiren in fort area, nia sources)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनुसख हिरेन सीएसटीला गेले होते. तिथे ते कुणाला भेटले या विषयचा गुंता आता सुटणार आहे. 17 फेब्रुवारी स्कॉर्पिओ मुलुंड-ऐरोली रोडवर खराब झाल्याने हिरेन हे ओला कॅबमधून दक्षिण मुंबईत आले होते. त्याच दिवशी वाझेही मुंबई पोलीस मुख्यालयात आले होते. मुख्यालय सोडल्यानंतर रहदारी सिग्नलवर सीएसएमटीच्या बाहेर थांबली होती. सिग्नल हिरवा होता. परंतु मर्सिडीत पुढे गेली नाही. वाझेंनी पार्किंग लाईट सुरू केली. रस्त्याच्याकडेला जीपीओसमोर ही मर्सिडीज पार्क करण्यात आली होती. ही रस्ता ओलांडून हिरेन मर्सिडीज जवळ आले. त्यावेळी हिरेन आणि वाझे यांच्यात दहा मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, यावेळी हिरेन यांनी त्यावेळी वाझेंना स्कॉर्पिओची चावी दिली होती का? याचा तपास एनआयएने सुरू केला आहे.

कोण आहेत मनसुख हिरेन?

मनसुख हिरेन यांनी जे प्रतिज्ञापत्र पोलीसात दाखल केलं आहे आणि विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी जे वाचून दाखवलं त्यानुसार- मनसुख हिरेन हे ऑटोमोबाईलच्या स्पेअर पार्टचा व्यवसाय करत होते. तीन मुलं आणि पत्नीसह ते ठाण्यात रहात होते. पत्नीचं नाव विमला आहे. त्यांचं वय 43 वर्षे. तीनही मुलांची वय हे 13 ते 20 वर्षाच्या दरम्यान आहे. सध्याच्या ठिकाणी ते 2005 सालापासून रहात आहेत.

कोण आहेत सचिन वाझे?

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले. सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे.

मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले. (Sachin Vaze Reinstated in Crime Branch) सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर ‘जिंकून हरलेली लढाई’ नावाचे पुस्तक मराठीत लिहिले होते. शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली. सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेवलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अ‍ॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते. (sachin vaze met mansukh hiren in fort area, nia sources)

संबंधित बातम्या:

वाझे प्रकरणात जप्त कारचे मूळ मालक शिवसेना पदाधिकारी, दोन वर्षांपूर्वीच गाडी विकल्याचा दावा

सचिन वाझे प्रकरणाचे नवी मुंबई कनेक्शन, सापडलेल्या 5 गाड्यांपैकी एक गाडी नवी मुंबईतील

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, कांदिवली क्राईम ब्रांचच्या पोलीस निरीक्षकाची ATS कडून चौकशी

(sachin vaze met mansukh hiren in fort area, nia sources)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.