दिल्लीत हिंसा भडकली हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश; संजय राऊतांचं थेट अमित शहांकडे बोट

बाबरी मशीद पडली तेव्हाही गुप्तचर यंत्रणेचं अपयश होतं आणि आज शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं हे सुद्धा गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. (Sanjay Raut reaction on Farmer Tractor rally violence)

दिल्लीत हिंसा भडकली हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश; संजय राऊतांचं थेट अमित शहांकडे बोट
संजय राऊत

मुंबई: बाबरी मशीद पडली तेव्हाही गुप्तचर यंत्रणेचं अपयश होतं आणि आज शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं हे सुद्धा गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बोट दाखवलं असलं तरी शहा यांचा राजीनामा मागितला नसल्याची सारवासारवही त्यांनी केली. (Sanjay Raut reaction on Farmer Tractor rally violence)

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आज भाजपवर जोरदार टीका केली. राजधानी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी शांततेत आंदोलन करत होते. पण दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला. त्यांनी उग्र आंदोलन केलं. याला जबाबदार कोण आहे? दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा का नाही काढला? चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवण्याचं कारण काय होतं? असे सवाल संजय राऊत यांनी केले आहेत.

आज काळा दिवस

शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या शांततामय आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. पण त्यांच्या आजच्या कृतीचं आम्ही समर्थन करत नाही. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. आज देशाच्या गौरवाचा दिन आहे. आजच्या दिवशीच हा प्रकार घडत असेल तर ते दुर्देव आहे, असं राऊत म्हणाले. प्रजासत्ताक दिनीच हा प्रकार घडणं हे दुर्देव आहे. आजचा दिवस हा काळा दिवस आहे, असंही ते म्हणाले. सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं केंद्र सरकारला वाटत असेल तर दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा का नाही काढला? असा सवाल त्यांनी केला. दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्या भावना का नाही समजून घेतल्या? असा सवालही त्यांनी केला.

 

सरकारने षडयंत्र रचलं आहे का?

शेतकरी शांततेत आंदोलन करत आहेत. त्यांचं म्हणणं मांडत आहेत. असं असतानाही त्यांचं ऐकून न घेण्याचं षडयंत्रं सरकारने रचलं आहे का? असा सवाल करतानाच कायदे नेमके कुणासाठी असतात? ज्यांच्यासाठी कायदे आहेत त्यांना ते मान्य नसेल तर त्या कायद्यांचा उपयोग काय? असा सवालही त्यांनी केला.

कुणाचा राजीनामा मागणार?

या ठिकाणी दुसरा पक्ष असता किंवा इतर कोणत्या राज्यात हा प्रकार घडला असता तर राजीनामा मागितला गेला असता. आज जी घटना घडली त्याबद्दल कुणाचा राजीनामा मागणार? सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवारांचा राजीनामा मागणार का की जो बायडनचा राजीनामा घेणार? कोण घेणार याची जबाबदारी?”, असे सवाल त्यांनी केले.

सरकारच्या अहंकारामुळेच हे घडतंय

“सरकारच्या अहंकारामुळे हे घडत आहे. सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणावी हे आमचं आवाहन आहे. काल मुंबईत हजारो शेतकरी आले, पण आम्ही परिस्थिती नियंत्रणात ठेवली”, असं ते म्हणाले. (Sanjay Raut reaction on Farmer Tractor rally violence)

शहांचा राजीनामा मागितला नाही

“अमित शहांचा राजीनामा मागितला नाही. दिल्लीत इतर कुणाचं सरकार असतं राजीनामा मागितला गेला असता. सोनिया गांधीचा राजीनामा मागितला असता. महाराष्ट्रात घडलं असतं तर उद्वव ठाकरेंचा राजीनामा मागितला असता”, असंही त्यांनी सांगितलं. “जाणूनबुजून आणीबाणीची परिस्थिती निर्माण केली जात आहे. गेल्या वर्षी शाहीनबागच्या निमित्ताने ही परिस्थिती निर्माण केली होती. वारंवार अशी परिस्थिती निर्माण करणं हा लोकशाहीला धोका आहे”, असा घणाघात त्यांनी केला. (Sanjay Raut reaction on Farmer Tractor rally violence)

संबंधित बातम्या:

राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत

Delhi Farmers Tractor Rally: राजीनामा तो बनता है साहेब; संजय राऊत यांची मागणी

Delhi Farmers Tractor Rally तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, शेतकरी आंदोलनावरुन संजय राऊत कडाडले

(Sanjay Raut reaction on Farmer Tractor rally violence)

Published On - 5:01 pm, Tue, 26 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI