सारा तेंडुलकर हीने मुंबईत केले अनोखे काम, सचिनच्या लाडक्या लेकीने मिळवली सर्वांची शाबासकी
सचिन तेंडुलकर यांची लाडकी कन्या सारा तेंडुलकर एक मोठे चांगले काम केले आहे,त्यामुळे सगळेच तिची वाहवा करीत आहेत. सारा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिने आपल्या फॅन्ससाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हीची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच बातम्यात असते. ती अलिकडेच परदेशातून सुट्टी साजरी करुन भारतात आली आहे. या दरम्यान साराने अनेक सुंदर देशांना भेट दिली. तेथे तिने मजामस्ती आणि खास क्षण व्यतित केले.सारा तेंडुलकर इंग्लंड येथेही दिसली होती. त्यामुळे मीडियात तिच्या बातम्या झळकल्या. आता सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने एक चांगले कार्य केले आहे. त्यामुळे तिची वाहवा होत आहे.
सारा तेंडुलकर हीने केले चांगले काम
मुंबईतील अंधेरीत बुधवारी एक खास कार्यक्रम झाला. त्यात सारा तेंडुलकर हीने टुगेदर फाऊंडेशनच्या दोन नवीन दुकानांचे उद्घाटन केले आहे. ही दुकाने ऑटिझम आणि अन्य बौद्धीक अक्षमता असणाऱ्या लोकांसाठी तयार केली आहेत. त्यामुळे त्यांना रोजगार मिळून त्यांना आत्मनिर्भर होण्ययाची संधी मिळणार आहे. या निमित्ताने नवीन उपक्रमाचे उद्घाटन झाले. सारा, स्वत: सचिन तेंडुलकर फाऊंडेशनची डायरेक्टर आहे. तिने या उपक्रमात सहभाग घेत एका मोठ्या स्वप्नांची ही सुरुवात असल्याचे सांगितले.
सारा तेंडुलकर हिने केले चांगले काम. (फोटो- instagram)

कार्यक्रमात बोलताना सारा तेंडुलकर हीने सांगितले की तिची आई डॉ.अंजली तेंडुलकर फाऊंडेशनच्या ट्रस्टी आहेत. त्यांच्याद्वारा टुगेदर फाऊंडेशनच्या कामाबद्दल आधीच माहिती होती. तिची इच्छा आहे की ही एक मोठ्या स्वप्नांची सुरुवात बनावी. तिने शिक्षक, पार्टनर्स आणि येथे काम करणाऱ्या लोकांच्या मेहनतीचे कौतूक केले. सारा म्हणाली की ही दुकाने केवळ विक्रीची जागा नाही तर आत्मविश्वास आणि स्वातंत्र्याचे प्रतिक आहेत. मी इच्छा करते की ही एक मोठ्या स्वप्नांची सुरुवात व्हावी. या दोन दुकानापैकी एक दुकानात फाऊंडेशनची FSSAI- सर्टीफाईड बेकरीत तयार केलेल्या सामानांची विक्री होईल. तर दुसऱ्या दुकानात हँडमेड साहित्य उदा.कागद, कपड्यांच्या पिशव्या, पाऊच आणि सणाचे साहित्य मिळेल.
अलिकडेच शुभमन गिल याच्याशी जोडले गेले नाव
सारा हीने यावर्षी जूनमध्ये आपल्या सुट्ट्यांची सुरुवात केली. या दरम्यान ती दुबई, स्वित्झर्लंड, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये फिरताना दिसली. लंडनमध्ये युवराज सिंह याने यावर्षी युव्हीकॅन फाऊंडेशन यांच्यासाठी एक चॅरिटी डीनरचे आयोजन केले होते. या इव्हेंटमध्ये सारा आणि शुभमन गिल देखील सहभागी झाले.त्यानंतर पुन्हा या दोघांचे नाव चर्चेत आले होते.याआधी देखील गिल आणि सारा यांचे नाव एकत्र जोडले गेले होते.
