समाज माध्यमावरुन जागा वाटपाची चर्चा कधी होत नसते, संजय राऊत यांचा आंबेडकरांना चिमटा

Sanjay Raut | महाविकास आघाडीतच अजून जागा वाटपाचे त्रांगडे सुटत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. तर आज होणाऱ्या बैठकीला सुद्ध आपल्याला आमंत्रण नसल्याचा त्यांचे म्हणणे होते. या सर्व प्रकरणावर आता संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत टोला हाणला आहे.

समाज माध्यमावरुन जागा वाटपाची चर्चा कधी होत नसते, संजय राऊत यांचा आंबेडकरांना चिमटा
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 11:47 AM

मुंबई | 15 March 2024 : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे त्रांगडे सुटल्यानंतर आमच्याशी चर्चा होईल, असा चिमटा काही दिवसांपूर्वी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काढला होता. तर काँग्रेसवर पण त्यांनी तोंडसूख घेतले होते. आंबेडकर यांची तोफ सतत धडाडत आहे. त्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर पण त्यांनी चांगलेच तोंडसूख घेतले. आज याविषयी खासदार संजय राऊत यांनी अखेर मौन सोडले. जागा वाटपाच्या चर्चा या काही सोशल मीडियातून होत नसल्याचा टोला त्यांनी आंबेडकरांना हाणला. तसेच आज होणारी बैठक महाविकास आघाडीची नसून दोन पक्षातील असल्याचे ते म्हणाले.

चार जागांचा प्रस्ताव

आजची बैठक महाविकास आघाडी म्हणून होत नाही किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये एका दुसऱ्या जागेवरून चर्चा होत आहे किंवा शिवसेना आणि काँग्रेस मध्ये एकाच दुसऱ्या जागेवरून चर्चा बाकी आहेत, त्या होत आहेत आणि त्या एकत्र होत नसून स्वतंत्रपणे होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्या जर आम्हाला वाटलं प्रकाश आंबेडकर आणि आमच्या मध्ये चर्चा होणे गरजेचे आहे तर त्या आम्ही स्वतंत्रपणे करू.वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागेचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि त्या चार जागा त्यांनी जे आम्हाला 27 जागेची यादी दिली होती त्यातल्या चार जागा आहेत. महाविकास आघाडी हे कुटुंब आहे प्रत्येकाने कधीही त्याच्यात येऊन बैठकीमध्ये आणि चर्चा मध्ये सामील होऊ शकता, त्यात मानपानाचे काही कारण नसल्याचे सांगत त्यांनी आंबेडकरांना चिमटा काढला.

हे सुद्धा वाचा

आपल्याला भाजपला पाडायचंय

कोणी कोणाला पाडत नाही हे पाडापाडीचे भूत कोणाच्या मानगुटीवर का बसत आहे हे माहित नाहीये. महाविकास आघाडीमध्ये कोणी कोणाला पाडापाडी करणार नाही. आम्हाला भाजपला पाडायचे आहे.आम्हाला हुकूमशाहीला पाडायचे आहे हे प्रकाश आंबेडकर साहेबांना माहित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ही तर भाजप स्क्रीप्ट

त्यात नवीन काय आहे शिंदे किंवा अजित पवार यांच्या गटाला जे बोलायचे आहे जे सांगायचे आहे त्याची स्क्रिप्ट हे संघ कार्यालयातून येतं किंवा भाजपच्या कार्यालयातून येतं त्यात लपून असं काहीच राहिले नाही आहे ते कुठे स्वतःची भाषा बोलत आहेत. असं असतं तर त्यांनी शरद पवार यांची घाणेरड्या शब्दातून टीका केली नसती ते भाजपचे धोरण आहे संघाचं धोरण आहे आणि ते अजित पवार व्यक्त करत आहेत, असा पलटवार त्यांनी केला.

निवडणूकच हायजॅक

निवडणुका आहेत निवडणुका पूर्णपणे ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न आहे जिंकण्याची खात्री नसल्यामुळे निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची असेल तर सगळ्यात आधी निवडणूक आयोग ताब्यात घ्यावा लागतो. त्यानुसार हा निर्णय झाला असेल तर आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे घटनात्मक पद्धतीने निवडणुका काम करत नाहीत हे अलीकडच्या त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे. आता निवृत्त निवडणूक आयोगावर अधिकारी निवडणूक आयोगावर आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी मोदी सरकारने नेमलेले आहेत त्यांच्याकडून या देशाच्या जनतेला आणि लोकशाहीला कोणतीही विशेष अपेक्षा नाही, असा घणाघात त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.