एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा झटका, पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. पक्षातील वरिष्ठ पातळीवरच्या काही पदाधिकाऱ्यांनी सामूहिकपणे राजीनामे दिले आहेत. या पदाधिकाऱ्यांचं पक्ष वाढीसाठी महत्त्वाचं योगदान आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात या पदाधिकाऱ्यांनी पक्षासोबत असणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा झटका, पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 7:57 PM

मुंबई | 8 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सामूहिक राजीनामे दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षात फूट पडून आता एक वर्ष पार पडलं आहे. शिंदे गटात गेल्या वर्षभरापासून इनकमिंग सुरु आहे. ठाकरे गटातील अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत. पक्षाला आणखी उभारी यावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पक्षात दररोज नवनवे कार्यक्रम पार पडत आहेत. दर आठवड्याला पक्षप्रवेशाचे कार्यक्रम पार पडत आहेत. राज्यभरातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. असं असताना आता शिंदे गटाच्याच वरिष्ठ पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या कांदिवली, चारकोप, मालाडमधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून आपला राजीनामा पाठवला आहे. या पदाधिकाऱ्यांनी पत्रात आपली नाराजी मांडली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.

‘सिद्धेश कदम यांच्याकडून पक्षात काम करु दिले जात नाही’, असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या पदाधिकाऱ्यांची संख्या ही तब्बल 30 ते 40 इतकी आहे. “आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण कदमांना समज द्या”, असं पदाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सिद्धेश कदम यांच्याकडून मानसिक छळाचा आरोप

कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे शिवसेना विभागप्रमुख विकास गुप्ता यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलीय. “आमच्या विधानसभा क्षेत्रात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सिद्धेश रामदास कदम यांची एन्ट्री झाली आहे तेव्हापासून आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देवून छळ केला जातोय. आम्ही या छळाला कंटाळून राजीनामा देत आहोत”, अशी प्रतिक्रिया विकास गुप्ता यांनी दिली.

सिद्धेश कदम यांच्याकडून अंतर्गत गटबाजीचा आरोप

मालाडचे विधानसभा संघटक नागेश आपटे यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. “मी मालाडमध्ये पक्षासाठी सुरुवातीपासून काम करत आहे. आता मालाडमध्ये जे काही सुरुय, पदावरुन लोकांना काढणे यामुळे पदाधिकारी चिंतेत आहेत. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार आहोत”, असं नागेश आपटे यांनी सांगितलं आहे.

चारकोप विधानसभाचे प्रमुख संजय सावंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “कांदिवली, चारकोप विधानसभा या भागातील आम्ही सर्व वरिष्ठ पदाधिकारी एकत्रितपणे सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहोत. कारण सिद्धेश रामदास कदम यांचा हस्तक्षेप आणि गटबाजीला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर त्यांना पक्षात जी गटबाजी चालली आहे याबाबत निश्चित माहिती देऊ”, अशी प्रतिक्रिया संजय सावंत यांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.