थोडा सस्पेन्स, थोडा खुलासा, ठाकरे गटाकडून उद्या महत्त्वपूर्ण घोषणा होणार

महाविकास आघाडीचं जागावाटप आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून आता उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाकडून उद्या सकाळी 9 वाजता उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. पण यादीत सर्व उमेदवारांची नावे नसतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे थोडा खुलासा आणि थोडा सस्पेन्स अशी परिस्थिती बघायला मिळण्याची शक्यता आहे.

थोडा सस्पेन्स, थोडा खुलासा, ठाकरे गटाकडून उद्या महत्त्वपूर्ण घोषणा होणार
ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा होणारImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 4:41 PM

शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गट लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली होती. पण महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना आणखी एका जागेची ऑफर देण्यात आल्याने ठाकरे गट वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. ठाकरे गट आता प्रकाश आंबेडकर यांच्याकडून काही प्रतिसाद येतो का? याची वाट पाहणार आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून उद्या सकाळी 9 वाजता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. या यादीत ठाकरे गटाच्या 15 उमेदवारांची नावे असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. असं असलं तरीही अजूनही 7 जागांबाबतचा सस्पेन्स कायम असणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गट 22 जागा लढवणार आहे. त्यापैकी 15 जागांच्या उमेदवारांची उद्या घोषणा होणार आहे. तर उर्वरित 7 जागांचा सस्पेन्स कायम असेल. ठाकरे गटाकडून उद्या सकाळी 9 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून याआधी वारंवार 22 जागांवर दावा करण्यात आला आहे. पण ठाकरे गटकडून उद्या 15 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे उर्वरित 7 जागांचं काय होणार? याबाबतचा सस्पेन्स कायम असणार आहे.

7 जागांबाबात मविआत आश्चर्यकारक घडामोडी बघायला मिळणार?

ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली जाणार होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आज पत्रकार परिषद होणार होती. या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा होणार होती. पण प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आल्यानंतर ठाकरे गटाची पहिली यादी उद्या सकाळी 9 वाजता जाहीर होईल, अशी माहिती समोर आली आहे. ज्या जागांवर तिढा आहे त्या जागा जाहीर केल्या जाणार नाहीत. अशा 7 जागांचा सस्पेन्स हा कायम असणार आहे. या 7 जागांच्याबाबत काही आश्चर्यकारक घडामोडी ठाकरे गट आणि महाविकास आघाडीत बघायला मिळण्याची शक्यता आहे.

‘वंचित’बद्दल मविआची नेमकी भूमिका काय?

वंचित बहुजन आघाडी पक्ष हा महाविकास आघाडीचा अविभाज्य घटक आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने सांगितलं जातंय. पण प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचित मविआत सहभागी झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. मविआकडून वंचितला 4 जागांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तर आता वंचितकडून मविआला लोकसभेच्या 6 जागांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या घडामोडींनंतर आता मविआकडून वंचितला आणखी एका जागेची ऑफर देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला 5 जागांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.