Chandivali Assembly Elections: नेहमी बदलणारा कौल देणारा चांदिवली मतदार संघातून यंदा कोण मारणार बाजी?
Chandivali Assembly Elections: भारतीय जनता पक्षाने रविवारी ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्या यादीत मुंबईतील १४ उमेदवार आहेत. त्यात चांदिवली मतदार संघातून कोणाचे नाव घोषित झाले नाही. त्यामुळे ही जागा शिवसेनेच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणीवरुन शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे पुन्हा इच्छूक आहेत.
Chandivali Assembly Elections 2024: मुंबई उपनगरातील चांदिवली मतदार संघ नेहमी संमिश्र कौल देणारा ठरणार आहे. कधी भाजप, कधी शिवसेना कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणावरुन निवडून आले आहे. दोन वेळा आमदार असलेल्या खान मोहम्मद आरिफ यांचा २०१९ मध्ये निसटता पराभव झाला होता. त्यावेळी शिवसेनेचे दिलीप भाऊसाहेब लांडे हे केवळ ४०९ मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे यंदा हा मतदार संघ कोणत्या पक्षाला साथ देणार हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
असा आहे इतिहास
चांदिवली विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. तसेच मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो. या ठिकाणी ४,४६,७६७ मतदार आहेत. या मतदार संघात २००९ आणि २०१४ मध्ये काँग्रेसचे खान मोहम्मद आरिफ विजयी झाले होते. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जाधव प्रदीप हेमसिंग तर १९९९ मध्ये भाजपचे डी.बी.पाटील विजयी झाले होते. १९९५ मध्ये भाजपचे दिगंबर बापूजी पवार यांना विजय मिळाला होता. १९९० मध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सुभाष लिंबाजी जाधव विजयी झाले होते. म्हणजे या मतदार संघावर कोणत्या एका पक्षाचा प्रभाव राहिला नाही.
लोकसभेचे गणित असे होते
नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा एकनाथ गायकवाड विजयी झाल्या. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ॲड उज्वल निकम यांचा पराभव केली. विजय-पराभवामधील फरक केवळ १६ हजार ५१४ मतांचा होता. त्यामुळे आता विधानसभेत कोणाच्या बाजूने कौल येणार? हे राजकीय तज्ज्ञही सांगू शकत नाही.
अशी होणार लढत
भारतीय जनता पक्षाने रविवारी ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्या यादीत मुंबईतील १४ उमेदवार आहेत. त्यात चांदिवली मतदार संघातून कोणाचे नाव घोषित झाले नाही. त्यामुळे ही जागा शिवसेनेच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणीवरुन शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे पुन्हा इच्छूक आहेत. आता त्यांना शिंदे गट किंवा महायुतीचे तिकीट मिळेल का? हे आता स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीत चांदिवली विधानसभा वादावर तोडगा निघाला. वांद्रे पूर्व विधानसभा उबाठा लढवणार तर चांदिवली विधानसभा काँग्रेस लढवणार आहेत. काँग्रेसकडून चांदिवलीतून नसीम खान यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.