AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Operation Tiger:डिनर डिप्लोमसीतून शिंदे सेना करणार गेम? ठाकरे सेनेचे दोन खासदार उपस्थित, ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत

Shivsena Operation Tiger: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिना अखेरीस दिल्ली दौरा केला. त्यांच्या दौऱ्यानंतर लागलीच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. त्यानंतर मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी झालेल्या स्नेहभोजनला ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी हजेरी लावली. गेल्यावर्षी सुद्धा हे खासदार उपस्थित होते. त्यामुळे ना ना चर्चांना उधाण आले आहे.

Shivsena Operation Tiger:डिनर डिप्लोमसीतून शिंदे सेना करणार गेम? ठाकरे सेनेचे दोन खासदार उपस्थित, ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत
शिवसेना, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 02, 2026 | 12:43 PM
Share

Shivsena Operation Tiger: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरत्या महिन्याच्या अखेरीस दिल्लीवारी केली. त्यानंतर खासदार ज्योती वाघमारे यांनी शरद पवार राष्ट्रवादीचे अथवा उद्धव सेनेचे काही खासदार संपर्कात असल्याची आणि ऑपरेशन टायगर अथवा ऑपरेशन तुतारी होण्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर दिल्लीत सालाबादाप्रमाणे केंद्रीय मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याला ठाकरे सेनेचे दोन खासदार उपस्थित होते. गेल्यावर्षी सुद्धा हे खासदार उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या उपस्थितीबाबत मातोश्रीवरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तरीही यावेळी हे खासदार उपस्थित असल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे.

दिल्लीत काय घडामोड?

राज्यात ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा सुरू असतानाच दिल्लीत खासदार प्रतापराव जाधव यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख हे उपस्थित होते. गेल्यावर्षी सु्द्धा आष्टीकर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. पक्ष वेगळे झाले तरी मित्र असल्याने त्यावेळी हजेरी लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर यावेळी आष्टीकरांना ऑपरेशन टायगरच्या चर्चेत काहीच तथ्य नसल्याचे म्हटले आहे. जाधव यांच्या ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम असल्याने अवघ्या काही मिनिटांसाठी त्यांचे भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऑपरेशन टायगरची सुरुवात?

तर या ताज्या घडामोडींमुळे ऑपरेशन टायगरची सुरुवात झाल्याचा दावा करण्यात येत आहे. शिंदे यांच्या दिल्लीवारीनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी खासदारांवर विश्वास असल्याचे म्हटले होते. तर राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्याने प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले जात होते. या बैठकीत मोठी खडाजंगी झाल्याचेही बोलले जात आहे. तर या बैठकीला कोण खासदार गैरहजर होता आणि तो का गैरहजर होता यावरून चर्चांना उधाण आले आहे. त्यातच दिल्लीतील डिनर डिप्लोपसी शिंदे सेनेच्या पथ्यावर पडते का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या एक दोन महिन्यात वेट अँड वॉचची स्थिती असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आज संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत न्याय व्यवस्थेवर आसूड ओढले आहे. त्यांनी अंतिम सुनावणीसाठी तारीख पे तारीख मिळत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व घाडमोडी येत्या दोन-तीन महिन्यात मोठ्या घडामोडींकडे लक्ष तर वेधत नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...