AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी धोंडे जेवणात व्यस्त तर कुणी नॉट रिचेबल… ठाकरेंच्या पार्टीत चाललंय काय? 4 खासदारांनी वाढवलं टेन्शन … ऑपरेशन टायगर यशस्वी?

Operation Tiger Eknath Shinde Uddhav Thackeray: मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीनं उद्धव सेनेचे टेन्शनं वाढवले आहे. कारण चार खासदारांनी या बैठकीला दांडी मारली आहे. ऑपरेशन टायगरची चर्चेला हवा मिळाली आहे.

कुणी धोंडे जेवणात व्यस्त तर कुणी नॉट रिचेबल... ठाकरेंच्या पार्टीत चाललंय काय? 4 खासदारांनी वाढवलं टेन्शन ... ऑपरेशन टायगर यशस्वी?
ऑपरेशन टायगर
| Updated on: Jun 14, 2026 | 2:31 PM
Share

Operation Tiger Eknath Shinde Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची मातोश्रीवर आज बैठक झाली. ऑपरेशन टायगरची चर्चा जोमात असताना उद्धव सेनेकडून बलाबलाची ही चाचपणी मानली जात आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. बैठकीला चार खासदारांनी दांडी मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. यातील दोन खासदारांचा नूर आणि सूर वेगळा असल्याचे म्हटले जात आहे. दोन खासदारांनी या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली. तर एक खासदार लवकर पोहचू शकला नाही. एका खासदार मुलाची तब्येत ठीक नसल्याने बैठकीस येण्या असमर्थता दर्शवली. तर दुसर्‍याने धोंड्याचे जेवण असल्याने बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे ऑपेरशन टायगर यशस्वी होणार का? या चर्चांना उधाण आले आहे.

बैठकीला उपस्थित कोण?

संजय राऊत (खासदार, राज्यसभा)

अरविंद सामंत (खासदार, दक्षिण मुंबई)

अनिल देसाई (खासदार, दक्षिण मध्य मुंबई)

राजाभाऊ वाजे (खासदार, नाशिक)

संजय दिना पाटील(खासदार, मुंबई ईशान्य)

व्हर्च्युअल उपस्थित असलेले खासदार

यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख हे बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. येत्या महिन्यात त्यांच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांनी या बैठकीला व्हर्च्युअली, ऑनलॉईन हजेरी लावली.

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे सध्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे त्यांनीही ऑनलाईन हजेरी लावणार असल्याची माहिती टीव्ही ९ मराठीने संपर्क साधल्यावर दिली. ते या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असल्याचे कळते.

मुलाच्या तब्येतीच्या कारणामुळे ओमराजेंची अनुपस्थिती

मुलाच्या तब्येतीच्या कारणामुळे ओमराजे निंबाळकर खासदारांच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. अनिल देसाईंकडे याबाबत निरोप दिला असल्याची माहिती ओमराजे निंबाळकर यांनी दिली. ते ऑफलाईन किंवा ऑनलाईन कोणत्याही पद्धतीने बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. मुलाच्या तब्येतीच्या कारणास्तव ओमराजे निंबाळकर पुण्यात आहेत.

धोंडे जेवण कार्यक्रम, खासदार बंडू जाधव यांची दांडी

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीला परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी दांडी मारली. खासदार संजय जाधव हे धोंडे जेवण कार्यक्रमाच्या निमित्ताने किर्तनात व्यग्र असल्याचे समजते. संजय जाधव हे बैठकीला दाखल न झाल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा होत आहे.

भाऊसाहेब वाकचौरे नॉट रिचेबल

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या मतदारसंघात उद्धव सेनेचा मोठा कार्यक्रम झाला. त्याला झाडून मोठे नेते उपस्थित होते. पण शिर्डीच्या कार्यक्रमात वाकचौरेंनी दांडी मारली होती. आताही ते मातोश्रीवर हजर नव्हेत. त्यामुळे त्यांची विकेट पडली का? अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. अद्याप त्यांनी माध्यमांसमोर अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

Follow Us
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?