Special Story : पुन्हा एका सयामी जुळ्यांना स्वतंत्र आयुष्य, वाडिया रुग्णालयात चौथी यशस्वी शस्त्रक्रिया

बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात पुन्हा एकदा सयामी जुळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Special Story : पुन्हा एका सयामी जुळ्यांना स्वतंत्र आयुष्य, वाडिया रुग्णालयात चौथी यशस्वी शस्त्रक्रिया
सागर जोशी

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 30, 2021 | 8:17 AM

मुंबई : परेलमधील बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात पुन्हा एकदा सयामी जुळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 14 दिवसांच्या सयामी जुळ्या मुलींवर झालेली शस्त्रक्रिया तब्बल 6 तास चालली. या शस्त्रक्रियेसाठी 50 डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली होती. या दोन्ही मुली छातीपासून बेंबीपर्यंत जोडल्या गेल्या होत्या. दोन्ही मुलींचे यकृत आणि छातीची हाडे जोडली गेली होती. आता शस्त्रक्रियेनंतर दोन्ही मुली वेगळ्या झाल्या असून, त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना कालच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.(Successful surgery on conjoined twin girls at Wadia Hospital)

आता स्वतंत्रपणे आयुष्य जगू शकणाऱ्या या चिमुकल्या मुलींच्या आईला रेग्यूलर चेकअप करताना अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीतून आपल्या पोटात सयामी जुळे असल्याचं समजलं. तेव्हा वाडिया हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कुटुंबियांनी त्या आईला आधार दिला. गेले काही महिने आमच्यासाठी खूप अवघड गेले. पण वाडिया रुग्णालयातील डॉक्टर आणि कुटुंबियांनी धिर दिल्यामुळे सर्व सुरळीत झालं, अशी प्रतिक्रिया सयामी जुळ्या बाळांच्या आईने दिलीय. अशा सयामी जुळ्यांना विभक्त करणारी वाडिया रुग्णालयातील ही चौथी यशस्वी शस्त्रक्रिया आहे. जन्म झाल्यानंतर या दोन्ही बाळांचे वजन एकत्रितरित्या वजन 4.2 किलोग्रॅम इतकं होतं.

हे सयामी जुळे ओम्फालोपॅग्ज (Omphalopagus) प्रकारातील

वाडिया रुग्णालयात सयामी जुळ्या मुलींवर झालेल्या शस्त्रक्रियेचं नेतृत्व रुग्णालयातील पेडियाट्रिक सर्जन डॉ. प्रज्ञा भेंद्रे यांनी केलं. डॉ. भेंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सयामी जुळे ओम्फालोपॅग्ज (Omphalopagus) प्रकारातील आहेत. या प्रकारात गॅस्ट्रोइंन्टेस्टायनल सिस्टिम आणि अॅब्डोमिनल वॉल जोडली गेलेले असतात. ओम्फालोपॅग्ज प्रकारचे सयामी जुळे 10 ते 18 टक्के पाहायला मिळतात.

सयामी जुळ्यांच्या जन्मानंतर दोन्ही बाळांचं मिळून वजन 4.2 किलो होतं. त्यामुळे त्यांना NICUमध्ये ठेवण्यात आलं. CT Scan मध्ये दिसून आलं की या जुळ्यांचं यकृत, छातीचा काही भाग आणि इंटेस्टाईन जोडलं गेल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर एक मोठी रक्तवाहिनी एका बाळातून दुसऱ्या बाळाच्या शरीरात गेली होती. हा प्रकार ओम्फालोपॅग्ज (Omphalopagus)प्रकारातील सयामी जुळ्यांमध्ये आढळून येतो. त्याचा परिणाम एका बाळाला हृदयासंबंधी काही विकास जडण्याची शक्यता निर्माण होते, असं डॉ. भेंद्रे यांनी सांगितलं.

दरम्यान आम्ही बाळाच्या आईची जुलै 2020 पासून काळजी घेत होतो. आम्ही कुठल्याही ट्रिटमेंट किंवा शस्त्रक्रियेची फी आकारली नसल्याचं वाडिया रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितलं. 1993 पासून वाडीया रुग्णालयात 4 सयामी जुळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचं बोधनवाला यांनी सांगितलं. या दोन्ही मुलींवरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर नुकताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वाडिया रुग्णालयाच्या पुढाकारातून या दोन्ही मुली आता स्वतंत्रपणे आपलं आयुष्य जगू शकणार आहेत.

सयामी जुळ्यांमध्ये ‘ओम्फालोपॅग्ज’ प्रकाराचे प्रमाण अधिक

सयामी जुळ्यांमध्ये ओम्फालोपॅग्ज (Omphalopagus) प्रकारातील जुळ्यांचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून आलं आहे. हा प्रकार सयामी जुळे ज्या ठिकाणी जोडले गेलेले असतात त्यावरुन ठरतो. या प्रकारातील जुळे हे abdominal region ला जोडले गेलेले असतात. या प्रकारातील जुळ्यांचं तोड एक एकमेकांच्या समोर असतं. त्यांना चार हात, चार पाय आणि दोन ओटीपोट असतं. या जुळ्यांमध्ये यकृत गॅस्ट्रोइंटेस्टायनल फन्क्शन्स एक असतात.

जुळी कशी जन्माला येतात?

मासिक पाळीच्या प्रारंभानंतर दहाव्या ते अठराव्या दिवसाच्या मधल्या काळात स्त्रीच्या प्रजोत्पादक केंद्रियात एक अंड तयार होतं. त्या काळात जर स्त्रीचा पुरुषाशी संबंध आला तर पुरुषाच्या शुक्राणूपैकी एक, स्त्रीच्या बीजांडामध्ये शिरतात. हे एकत्र आले की फलन होतं आणि स्त्री गरोदर राहते. परंतू काही वेळा गर्भधारणेनंतर अंड्याचे आपोआप दोन भागात विभाजन होते आणि हे दोन्ही भाग गर्भाशयात दोन गर्भ म्हणून विकसित होतात. त्याचा परिणाम त्या स्त्रीला एकाच वेळी दोन बाळ होतात. अशाप्रकारे झालेल्या बाळांच्या चेहऱ्यात आणि रुपात साम्य दिसते. त्यांची बरीच लक्षणंही समान असतात. ही दोन्ही बालके दोघेही मुलगे किंवा दोन्हीही मुली असू शकतात. याचे कारण ही दोन्ही बालके एकाच अंडाणूपासून निर्माण होतात. काही वेळा अशीही एक शकत्यता असते की, पुरुषाच्या दोन शुक्राणू अलगपणे एकाच स्त्रीच्या दोन अंडाणूमध्ये प्रवेश करतात. त्यातून गर्भाशयात दोन गर्भ विकसित होऊन स्त्री दोन बालकांना जन्म देते. अशा प्रकारे जन्मलेली दोन मुले एकमेकांपासून भिन्न असू शकतात. त्यांचे लिंग समान किंवा भिन्नही असू शकते.

सयामी जुळे कसे होतात?

एकाच बीजांडापासून जुळ्यांची निर्मिती होते. हे बीजांड विकसित होतं आणि नंतर दोन्ही बाळं वेगळी होत जातात. पण काही परिस्थितीमध्ये मुलं पूर्णपणे वेगळी होत नाहीत आणि गर्भात मोठी होत असतानाही त्यांचे काही अवयव चिकटलेलेच असतात. सयामी जुळ्यांच्या बाबतीत सहसा असं असतं की त्यांची शरीरं जोडलेली असतात.

इतर स्पेशल स्टोरी : 

Special Stroy: भूकंपामुळे सुरु झाली ‘ही’ कार कंपनी; आता विकतेय जगात सर्वाधिक कार

Special Story | कोरोनानंतर शाळेची घंटा पुन्हा वाजणार, पण विद्यार्थी-पालकांचा मूड काय?

Successful surgery on conjoined twin girls at Wadia Hospital

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें