AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बलात्कार नाही, रिलेशनशीपमध्ये! टीव्ही अभिनेत्रीचा आरोप प्लॅस्टिक सर्जनने फेटाळला

मुंबई उपनगरात असलेल्या क्लिनिकमध्ये 9 ऑगस्ट रोजी कॉस्मेटिक सर्जनने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा तक्रारदार अभिनेत्रीने केला होता

बलात्कार नाही, रिलेशनशीपमध्ये! टीव्ही अभिनेत्रीचा आरोप प्लॅस्टिक सर्जनने फेटाळला
| Updated on: Nov 21, 2019 | 8:35 AM
Share

मुंबई : एका सेलिब्रिटी कॉस्मेटिक आणि प्लॅस्टिक सर्जनने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुंबईतील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला आहे. मात्र हा बलात्कार नसून गेल्या काही वर्षांपासून आम्ही परस्पर संमतीने रिलेशनशीपमध्ये आहोत, असा दावा आरोपीने (TV Actress Assault Case) केला आहे.

सेशन्स कोर्टाने मंगळवारी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश कल्पना एस होरे यांनी आरोपीला जामीन दिला. मुंबई उपनगरात असलेल्या क्लिनिकमध्ये 9 ऑगस्ट रोजी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा तक्रारदार अभिनेत्रीने केला होता. त्यानंतर आरोपीविरोधात कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

अटकपूर्व जामिन अर्जात आरोपीने बलात्काराचे आरोप फेटाळले होते. आम्ही गेल्या काही वर्षांपासून परस्पर संमतीने रिलेशनशीपमध्ये आहोत, असा दावा आरोपी प्लॅस्टिक सर्जनने केला होता. आपल्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी त्याने छायाचित्रं आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या स्वरुपात कोर्टासमोर पुरावेही सादर केले होते.

सलमान खानच्या ex मेहुण्यासोबत रिलेशनशीपमध्ये, ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची कबुली

ज्या दिवशी अत्याचाराची घटना घडल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे, त्या दिवसाची वस्तुस्थिती तिने हेतूपुरस्सर चुकीच्या पद्धतीने मांडली होती, असंही त्याने कोर्टाला सांगितलं होतं.

कथित पीडितेने कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करण्याचा प्रयत्‍न केला, मात्र आपण परस्पर सहमतीने रिलेशनशीपमध्ये असल्याचे पुरावे देत तिचा डाव उलथून पाडला, अशा शब्दात आरोपीने कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत (TV Actress Assault Case) केलं.

पालघरमध्ये विद्यार्थिनीची हत्या

एकतर्फी प्रेमातून नववीच्या विद्यार्थीनीची हत्या करुन मुंबईपासून 118 किमीवर नेऊन तिचा मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. पालघरमधील तलासरीत 15 वर्षीय मुलीचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. ऑक्टोबरमध्ये विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबाने समता नगर पोलिस ठाण्यात दिली होती. ती पोयसरमधील जनिया कम्पाऊंड येथून बेपत्ता झाली होती. त्यानंतर 3 ऑक्टोबरला मुलीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत मिळाला. आता पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.