Raj Thackeray: ही बसवलेली माणसं, फक्त मोदींवर अवलंबून… राज ठाकरेंनी पिसेच काढली

Uddhav Thackeray-Raj Thackeray Joint interview: ठाकरे बंधुंच्या संयुक्त मुलाखतींकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दोन्ही बंधु काय बोलतात, कोणता मुद्दा मांडतात आणि काय साद घालतात याची चर्चा होती. या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित झाला आहे. त्यात राज ठाकरे यांनी सणसणीत टोलेबाजी केली.

Raj Thackeray: ही बसवलेली माणसं, फक्त मोदींवर अवलंबून… राज ठाकरेंनी पिसेच काढली
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संयुक्त मुलाखत, मनसे, शिवसेना
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 08, 2026 | 9:22 AM

Raj Thackeray on BJP: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधु विरुद्ध भाजप-शिंदेसेना असा सामना होणार आहे. त्यापूर्वी ठाकरे बंधुंची संयुक्त मुलाखत समोर आली आहे. दोन्ही बंधुंचा अजेंडा काय, मुंबईच्या विकासासंबंधीचं धोरण काय आणि ते काय मुद्दे मांडतील, काय साद घालतील आणि कुणावर टीका करती याकडे सगळ्याचंच लक्ष लागलं होतं. या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित झाला आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. मुंबई तोडण्यापासून ते अदानी आणि भाजप-शिंदे सेनेपर्यंत सर्वच मुद्यांवर दणदणीत, खणखणीत आणि जळजळीत भाष्य दोघांनी केले. यावेळी भाजपवर राज ठाकरे कडाडले.

या मुलाखतीत संजय राऊत यांनी दोन्ही बंधुंवर भाजपकडून विशेषतः मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेल्या टिप्पणीकडं लक्ष वेधलं. दोन्ही बंधु एकत्र आला यामुळे महाराष्ट्राला आनंद झाला. मराठी माणूस एकवटला. पण भाजपचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या युतीविषयी म्हणतात की ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे. म्हणजे राज ठाकरे हे कन्फ्युज आहेत, असं ते म्हणतात आणि उद्धवजींवर त्यांनी करप्शनचा आरोप केला. आपण कन्फ्युज आहाता का? असा सवाल संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना केला. त्यावर राज ठाकरे यांनी खास ठेवणीतील सोटा बाहेर काढून उत्तर दिले.

ही बसवलेली माणसं

संजय राऊत यांच्या या प्रश्नावर राज ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिलं. पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्यांचा डोलारा हा फक्त नरेंद्र मोदींवर अवलंबून आहे. ही त्यांनीच बसवलेली माणसं आहेत सगळी. यातला बसलेला माणूस कोणीच नाही. बसलेला म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आलेला आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचं ऐकतो, मालकाचं ऐकतो. मालक जे सांगेल, त्याप्रमाणं काम करायचं. त्यामुळं त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटतं नाही, असं उत्तर राज ठाकरे यांनी या आरोपांवर दिलं.

तर विकासाच्या नावाखाली मुंबईत काय काय सुरु आहे, यावरही त्यांनी भाष्य केलं. मुंबई, ठाणे, पनवेल आणि नवी मुंबईत आपण गेलो तर असं दिसतं की प्रचंड मोठ्या प्रमाणावर रिडेव्हलपमेंट सुरु आहे. झाडं तोडतायत. होत काय की, आपल्याकडं डीपी बनतो. पण टाऊन प्लॅनिंग होत नाही. मी यापूर्वी पुण्यात म्हणालो होतो की मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला. पुण्याला तो वेळ मिळणार नाही. पुणं लवकरात लवकर बरबाद होईल, असं राज ठाकरे म्हणाले.