जय शाह आणि आंडूपाडू मॅच बघायला गेल्यावर देशद्रोही ठरवणार का?; उद्धव ठाकरे यांचा खरमरीत सवाल
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी नुकताच बोलताना उद्या होणाऱ्या मॅचबाबत खरमरीत सवाल केला आहे. जय शाह आणि आंडूपाडू मॅच बघायला गेल्यावर देशद्रोही ठरवणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...

उद्या, 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. मात्र, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार असल्यामुळे भारतात मोठा गदारोळ सुरु आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट जय शाह आणि आंडूपाडू मॅच बघायला गेल्यावर देशद्रोही ठरवणार का? असा खरमरीत सवाल उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतलीय. या पत्रकार परिषदेत, ‘विक्रोळीला मराठी दांडिया आयोजित केल्या. त्याची थीम सिंदूर आहे. एवढा निर्लज्जपणा. तिकडे माता भगिणींचं सौभाग्य उजाडलं गेलं. ते चित्र डोळ्यासमोरून जात नाही. आक्रोश आजही ऐकायला येतो. हे नालायक सिंदूर वाटप काय करत आहेत? दांडिया खेळत आहेत. भारत पाकिस्तान मॅचचे तिकीट पूर्वी झटक्यात खपायचे. पण अजूनही उद्याच्या मॅचला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मोदींना विचारायचंय की तुमचे सर्व आंडूपांडू लोकं आजूबाजूला बसलेत. अगदी बीसीसीआयचे जय शाह सुद्धा. नीरज चोप्रांना देशद्रोही म्हणत असाल तर उद्या जय शाह तिकडे गेल्यावर जय शाह देशद्रोही आहे का त्याचं उत्तर पाहिजे’ त्यांनी असा सवाल केला.
वाचा: गोरेगावमधील धक्कादायक प्रकार! आईला आवडला लेकीची BF, घरात चोरी झाली अन्… नेमकं प्रकरण काय?
“उद्या जे जे लोक टीव्हीवर मॅच बघतील ते देशद्रोही आहेत का?”
पुढे ते म्हणाले, उद्या जे लोक क्रिकेट मॅच बघायला जातील ते देशद्रोही आहेत का? उद्या जे जे लोक टीव्हीवर मॅच बघतील ते देशद्रोही आहेत का? यांना जाहिरातीची चटक लागलीय. हे निर्लज्ज आहे. उद्याच्या क्रिकेट सामन्यात दांडियाची जाहिरात टाका. दांडिया आहे. बघायला या. कारण ते करू शकतात. हा एवढा सर्व कळस पाहिल्यावर वाटलं होतं कणखर पंतप्रधान लाभेल. म्हणून पाठिंबा दिला. विदेश नीतीही सरपटणारी आहे. बुळबुळीत सरकार आपल्याला न्याय देणार नाही. पाकिस्तान सोडाच पाकव्याप्त काश्मीर परत आणू शकेल यावर माझा विश्वास राहिला नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला किंमत देत नाही. कारण ते त्यावेळी नव्हते. मी तिथे होतो. मोदी जसे गुपचूप केक खाऊन आले होते. जिनाच्या थडग्यावर त्यांच्या नेत्यांनी डोकं टेकवलं त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये.
“हरभजन सिंह म्हणाला क्रिकेट होता कामा नये. सौरव गांगुलीही मध्ये म्हणाला होता. आता जय शाहच्या हातात क्रिकेट आहे. देश हरला काय जिंकला काय. माझ्या विरोधात बोलला तर घरी जा. फायनलचा सामना अहमदाबादला नेला. तो पैशासाठी. त्यांना पैसा प्यारा आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
