AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय घेतली शपथ? शब्द न् शब्द जशाच्या तसा…

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावाच्या विरोधात शपथ घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच माहीमच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपण राज ठाकरे यांच्यासोबत कधीच राजकीय मैत्री करणार नाही, अशी शपथ घेतली.

राज ठाकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय घेतली शपथ? शब्द न् शब्द जशाच्या तसा...
राज ठाकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय घेतली शपथ?
| Updated on: Nov 12, 2024 | 6:08 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात थेट शपथ घेतली आहे. कितीही काहीही झाली तरी आपण राज ठाकरे यांच्यासोबत राजकीय मैत्री करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यासाठी त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. “महाराष्ट्राच्या लुटारूंना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष… जसं ते हे करतात ना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दाखवणार नाही, हे करणार नाही, अशी शपथ घेतो, महाराष्ट्राच्या लुटारूंना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही अथवा मदत करणाऱ्यांना देखील मदत करणार नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय”, अशी शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी राज ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी ही शपथ घेतली.

“महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. तुम्ही ग्रामीण भागात जाऊन पाहा. मुलांच्या शिक्षणाची वाट लागलीय. वडील आत्महत्या करत आहे. अशा कुटुंबाकडे कोण पाहणार. हे सरकार आलं तर असे चालूच राहील”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे या निवडणुकीला दादर-माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला असता “महाराष्ट्राच्या लुटारुंना मी स्वप्नातही पाठिंबा देणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे अमित ठाकरे यांच्याबाबत नेमकं काय म्हणाले?

“जे महाराष्ट्राचे लुटारू आहेत त्यांना मी स्वप्नातही पाठिंबा देणार नाही. विषय संपला. माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी आहे. महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. कोरोनात मी जबाबदारी घेतली ना. ते कुटुंब लुटलं जातं. त्या लुटारूंना अप्रत्यक्षपणे स्वप्नात पाठिंबा देणार नाही. माझं मत आहे. महाराष्ट्र प्रेमींनी महाराष्ट्र लुटारूंना पाठिंबा देऊ नये. महायुती महाराष्ट्र लुटतात. त्यांना पाठिंबा देणारे यांनाही पाठिंबा नाही”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली.

“माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तर खिल्ली उडवली होती. आता त्याची जबाबदारी घेतली तर पोटात का दुखतं. माझी तेव्हा खिल्ली उडवली. माझ्या आजाराची नक्कल केली. त्यांना मी मदत करणार नाही”, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू.
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?.
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.