AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : मुंबईची तुंबई होणार? पुराचा अलर्ट BMCकडून थेट मोबाईलवर! पावसाआधी Must Download

सध्या आपत्ती व्यवस्थापन अ‍ॅपमध्ये संबंधित 24 वॉर्ड, पूर-प्रवण क्षेत्र किंवा जुनाट पाणी साचलेल्या ठिकाणांची माहिती आहे.

Mumbai : मुंबईची तुंबई होणार? पुराचा अलर्ट BMCकडून थेट मोबाईलवर! पावसाआधी Must Download
मुंबईImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 1:45 PM
Share

मुंबई : भूविज्ञान मंत्रालय (MoES) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्या संयुक्त पुढाकारानं पूर (Flood) चेतावणी प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्याला iFLOWS असं नाव देण्यात आलंय. ही प्रणाली मुंबईकरांना 6 ते 72 तास अगोदर संभाव्य पूर परिस्थितीचा अलर्ट तुमच्या मोबाईलवर देईल, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. ही प्रणाली पुराच्या पाण्याची संभाव्य उंची आणि सर्व 24 वॉर्डांमधील स्थाननिहाय समस्या क्षेत्रांसह सर्व माहिती देणं आणि पुराच्या संपर्कात येणाऱ्या घटकांच्या जोखमीसह असुरक्षिततेची गणना करणार आहे. यामुळे मदत तात्काळ होण्यास मदत होईल. तर यामुळे नागरिकांना इतर गोष्टींबरोबरच त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यातही मदत होऊ शकते. यामुळे पाऊस आल्यास मुंबईकरांना मोबाईलवर 6 ते 72 तास अगोदर माहिती मिळाल्यानं त्यांना लगेच अलर्ट होऊन पुढील नियोजन करता येईल. यामुळे या प्रणालीचा मुंबईकरांना फायदा होऊ शकतो.

पाणी साचलेल्या ठिकाणांची माहिती

‘डिझास्टर मॅनेजमेंट एमसीजीएम’ मोबाइल अ‍ॅप्लिकेशन अपडेट करत आहे. ते पूर आणि अतिवृष्टीच्या अलर्टसह तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर वाढल्यावर उष्णतेच्या लाटा, अलर्ट देखील पाठवेल. सध्या आपत्ती व्यवस्थापन अ‍ॅपमध्ये संबंधित 24 वॉर्ड, पूर-प्रवण क्षेत्र किंवा जुनाट पाणी साचलेल्या ठिकाणांची माहिती आहे. रिअल-टाइम अपडेट नाही. मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये पावसाच्या डेटासह भूस्खलन प्रवण क्षेत्र, जीर्ण इमारती आणि वाहतूक वळवण्याच्या मार्गांची यादी देखील आहे.

या प्रणालीमध्ये नॅशनल सेंटर फॉर मिडियम-रेंज वेदर फोरकास्टिंग (NCMRWF), भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेनं (IITM), BMC द्वारे स्थापित केलेल्या 165 स्थानकांच्या पर्जन्यमापक नेटवर्कमधील फील्ड डेटाचा समावेश केला आहे.पूर येण्यापूर्वीच्या तयारीचा एक भाग म्हणून ही यंत्रणा नागरिकांना सावध करण्यास मदत करेल. अशा परिस्थितीसाठी अगोदर तयार राहता येईल.

सुरक्षित ठिकाणी हलवता येईल

पूर्व चेतावणीच्या अंदाजामध्ये पाऊस, भरती-ओहोटी, आणि वादळाचा परिणाम होण्याचा अंदाज असलेल्या सखल भागांबद्दलच्या सूचनांचा समावेश असेल. यामुळे मुंबईतील चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान कमी करून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवता येईल. ही प्रणाली पुराच्या पाण्याची संभाव्य उंची आणि सर्व 24 वॉर्डांमधील स्थाननिहाय समस्या क्षेत्रांसह सर्व माहिती देणं आणि पुराच्या संपर्कात येणाऱ्या घटकांच्या जोखमीसह असुरक्षिततेची गणना करणार आहे. यामुळे मदत तात्काळ होण्यास मदत होईल. तर यामुळे नागरिकांना इतर गोष्टींबरोबरच त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यातही मदत होऊ शकते. यामुळे पाऊस आल्यास मुंबईकरांना मोबाईलवर 6 ते 72 तास अगोदर माहिती मिळाल्यानं त्यांना लगेच अलर्ट होऊन पुढील नियोजन करता येईल.

गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.