AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट केसमधील साक्षीदाराने साक्ष बदलली, सुनावणी दरम्यान धक्कादायक खुलासा

2008 मालेगाव ब्लास्ट केसमध्ये मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात दैनंदिन सुनावणी सुरू आहे. न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्या न्यायालयात या प्रकरणात दैनंदिन सुनावणी सुरु आहे. आज झालेल्या सुनावणीत ह्या प्रकरणातील साक्षीदार क्रमांक 40 यांनी अतिशय धक्कादायक खुलासे न्यायालयासमोर केले.

Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट केसमधील साक्षीदाराने साक्ष बदलली, सुनावणी दरम्यान धक्कादायक खुलासा
प्रेयसीच्या नकारामुळे केला होता आत्महत्येचा प्रयत्न; पाच वर्षांनंतर तुरुंगातून झाली सुटका
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 5:16 PM
Share

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने आपली साक्ष बदलली आहे. आजच्या सुनावणीत साक्षीदाराने दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) परमबीर सिंह आणि श्रीराव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2008 मालेगाव ब्लास्ट केसमध्ये मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात दैनंदिन सुनावणी सुरू आहे. न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्या न्यायालयात या प्रकरणात दैनंदिन सुनावणी सुरु आहे. आज झालेल्या सुनावणीत ह्या प्रकरणातील साक्षीदार क्रमांक 40 यांनी अतिशय धक्कादायक खुलासे न्यायालयासमोर केले.

एटीएस अधिकाऱ्यांनी साक्षीदारावर दबाव टाकला

साक्षीदाराने न्यायालयाला साक्ष देताना सांगितले की, एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला की जर साक्षीदाराने त्यांच्या म्हणण्यानुसार जवाब दिला नाही तर त्यांच्या कुटुंबाला इजा पोहचवण्यात येईल. आपल्या जबाबात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या नावंचा उल्लेख करावा ह्यासाठी एटीएस दबाव टाकत असल्याचा दावा साक्षीदाराने कोर्टात आज केला. या उच्चपदस्थ आरएसएस पदाधिकाऱ्यांमध्ये योगी आदित्यनाथ, स्वामी असिमानंद, प्रो देवधर, काकाजी, इंद्रेश कुमार यांची नावे आपल्या जबाबात नोंदवावी, यासाठी एटीएस साक्षीदारांवर दबाव टाकत असल्याची माहिती साक्षीदाराने कोर्टात दिली. साक्षीदाराने तत्कालीन एटीएसचे अधिकारी परमवीर सिंह आणि डीसीपी श्रीराव यांच्या संदर्भात आक्षेप सुद्धा साक्षीदाराने नोंदवले. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये 15 साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली आहे.

2008 मध्ये झाला होता बॉम्बस्फोट

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर याही या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे. (Witness in Malegaon bomb blast case changed his testimony)

इतर बातम्या

पंढरपूरमध्ये ‘मिर्झापूर’, माझ्या मुलामुळे दिवस जात नाहीत, तर माझ्याशी संबंध ठेव, सासऱ्याची सुनेवर बळजबरी

माझ्या बायकोचा नवरा! पहिल्या पत्नीचा मृत्यू, दुसरीचा जीव प्रियकरात अडकला, नवऱ्याने काय केलं बघा

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.