AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : नाराज एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार ? कोणाची जाणार विकेट ? मोठ्या घडामोडींना वेग

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, भाजपने आघाडी घेतली आहे. महायुतीत असूनही शिंदे गटाच्या शिवसेनेला फारसे यश मिळाले नाही. मुंबईतही ठाकरे गटाने शिंदे गटाला मात दिली. या सुमार कामगिरीमुळे एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असून, लवकरच अकार्यक्षम मंत्र्यांना पदावरून हटवून पक्षबांधणीची जबाबदारी देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.

Eknath Shinde : नाराज एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार ? कोणाची जाणार विकेट ? मोठ्या घडामोडींना वेग
एकनाथ शिंदे नाराज ?
| Updated on: Jan 19, 2026 | 1:34 PM
Share

मुंबईसह राज्यातील 29 महापलिकांच्या (Municipal Elections 2026)  मतदानानंतर शुक्रवारी निकाल जाहीर झाले. भाजप हा पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरला असून महायुतीत असूनही शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला फारसा फायदा झाला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तर भाजपसोबत युती न करता एकला चालो रे चा मार्ग निवडला, प्रसंगी काही ठिकाणी काका शरद पवारांचा हात धरत त्यांच्याराष्ट्रवादीीही युती केली. मात्र शिंदेंच्या सेनेचे तसं नाही. त्यांनी मुंबई महापालिकेत भाजपसोबत महायुती करत निवडणूक लढवली. मात्र तिथे त्यांचे फक्त 29 नगरसेवक निवडून आले. ठाकरे गटाच्या उमेदावारांन अनेक ठिकाणी त्यांचा पराभव केला. आणि मुंबईत व सर्व ठिकाणी भाजपचाच वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे.

29 महापालिकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाची कामगिरी फारशी साजेशी झालेली नसून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जेवढं यश अपेक्षित होतं ते न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. जिथे जिथे पदरी अपयश आलं तिथल्या  स्थानिक नेतृत्वाची भाकरी फिरवण्याच्या तयारीत  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत असंही समजतं. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.

एकनाथ शिंदे प्रचंड नाराज 

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांमध्ये निवडणूक झाली.  मात्र तिथे शिंदेंच्या शिवसेनेची  फारशी उत्तम कामगिरी झाली नाह. एक ठाणे वगळता बाकी सर्व ठिकाणी शिंदेंच्या सेनेचा परफॉर्मन्स यथातथाच होता.  महापालिका निवडणुकांमध्ये  अपेक्षित निकाल  लागल्यामुळे तेथील पक्षातील मंत्री आणि आमदार यांच्या सुमार कामगिरीवर एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

डिसेंबरमध्ये निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारील मतदान होऊन 16 तारखेला निकाल लागला. सर्व्तर भारतीय जनता पक्षाचाच बोलबाला दिसून आला. 29 पैकी 25 पेक्षा अधिक ठिकाणी भाजपचेचे वर्चस्व दिसून आले. दरम्यान या महापालिका निवडणुकीपूर्वी  एकनाथ शिंदे यानी शिवसेनेतील मंत्री आणि आमदार यांच्यावर विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली होती. पण ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. उर्वरित महापालिकांमध्ये सनेची कामगिरी यथातथाच होती.

कोणाची जाणार विकेट ?

त्यामुळे ज्या मंत्र्यांवर जबाबदार सोपवण्यात आली होती, ज्यांची कामगिरी सुमार झाली, जिथे अपेक्षित यश मिळालं नाही , त्या सर्वांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. जे मंत्री अकार्यक्षम ठरले त्यांची विकेट जाण्याची चिन्हं असून  एकनाथ शिंदे हे त्यांना डच्चू देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबतचे संकेत एकनाथ शिंदेंनी महापालिका निवडणूकीपूर्वीच मंत्र्यांना दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पालिका निवडणूक ही शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी लिटमस्ट टेस्ट होती असंही म्हटलं जातं. त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्यावर पक्ष बांधणीची जबाबदारी सोपवण्यात  येणार आहे. तर त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी  एकनाथ शिंदे हे देणार असल्याचे कळते.  जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकीत पक्ष जरी दुसऱ्या क्रमांकावर असला तरी अपेक्षित कामगिरीही नेत्यांकडून झाली नसल्याने मंत्रीमंडळातून कोणाला डच्चू मिळतो आणि कुणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडते हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळेच अनेकांची धाकधूक वाढली आहे.

भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.
निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?
निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?.
दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन की विलीनीकरण
दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन की विलीनीकरण.
महापौरपदाची निवड लांबणार, मोठं कारण आलं समोर; इच्छुक चिंतेत
महापौरपदाची निवड लांबणार, मोठं कारण आलं समोर; इच्छुक चिंतेत.
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा.
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका.
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश.
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर.
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?.