नव्या पार्किंग समस्येवर पालिकेचे नवीन धोरण; तीन प्रभागात होणार प्रयोग

डी, के पश्‍चिम आणि एस प्रभागात नवीन प्रयोग अंमलात आणण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी या नवीन धोरणाला मंजुरी दिली आहे.

नव्या पार्किंग समस्येवर पालिकेचे नवीन धोरण;  तीन प्रभागात होणार प्रयोग
mumbai municiple corporation
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 10:02 PM

मुंबईः मुंबईतील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी आता मुंबई महापालिकेने जुन्या धोरणात बदल करत नवीन धोरण अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या धोरणानुसार स्थानिक गरजेनुसार पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. डी, के पश्‍चिम आणि एस प्रभागात नवीन प्रयोग अंमलात आणण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी या नवीन धोरणाला मंजुरी दिली आहे.

वाहनतळातच पिक अप ड्रॉप, मालाची लोडिंग अनलोडिंगची सोय

वाहनतळातच पिक अप ड्रॉप, मालाची लोडिंग अनलोडिंगची सोय उपलब्ध होणार आहे. स्थानिकांच्या गरजा ओळखून वाहनतळाची आखणी करण्यासाठी स्थानिक नागरिक, नोकरदार यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. मुंबई शहरासाठी स्वतंत्र पार्किग प्राधिकरण तयार करण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त पी. वेलरसू असून, निवृत्त सनदी अधिकारी डॉ. रामनाथ झा हे सल्लागार आहे.

पार्किंग सुलभ होण्याच्या दृष्टीने जुन्या धोरणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार

या समितीने प्रस्तावित धोरणाबाबत आयुक्तांसमोर सादरीकरण केले. नागरिकांना ऑनलाईन पार्किंग बुकिंग करण्यासाठी तसेच पार्किंग सुलभ होण्याच्या दृष्टीने जुन्या धोरणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यात प्रामुख्याने स्थानिक परिसरात असलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांचा वावर त्यांच्या गरजा ओळखून स्थानिक वाहनतळांची निर्मिती करण्यात यावी. प्रवाशांची पिक अप ड्रॉप सुविधा, माल उतरवणे चढवणे, गॅरेजेस या दृष्टीने या वाहनतळाचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी या समितीला दिला.

पोलिसांशी चर्चा करून याबाबत स्थानिक पातळीवर अंतिम निर्णय घेण्यात येणार

स्थानिक विभाग पातळीवरील पालिका अधिकारी, वाहतूक पोलीस तसेच स्थानिक पोलिसांशी चर्चा करून याबाबत स्थानिक पातळीवर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. महापालिकेने यापूर्वी स्थानिक पातळीवर वाहनतळ तयार करता येईल, अशा जागा निश्‍चित करण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. यात बहुमजली पार्किंगसह रस्त्यावरील पार्किंगसाठीही जागा निश्‍चित करण्यात येणार आहे. या जागा निश्‍चित पुढील कार्यवाही करण्यात येणार असून भविष्यात मोबाईल ऍप्लिकेशन वरुनही पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

अशी उपलब्ध होणार सुविधा!

रिक्षा टॅक्‍सी चालकांना माफकदरात वाहानतळात पार्किंग उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सर्व प्राधिकरणाच्या मालकींची वाहानतळा पार्किग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आणण्यात येणार आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थानिकांशी चर्चा करण्यात येणार आहे. ग्रॅन्ट रोड, नाना चौका, ताडदेव, अंधेरी, जोगेश्‍वरी पश्‍चिम आणि विक्रोळी, भांडुप या परिसरात प्रयोग होणार आहे.

अशा प्रकारे होणार प्रक्रिया

1. मुंबई महापालिका अधिनियमांतर्गत बृहन्मुंबई वाहनतळ प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी असणाऱ्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करणे व मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची संस्थात्मक निर्मिती करणे

2. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमधील वाहनातळ व्यवस्थापन विषयक सर्वसमावेशक आराखडा तयार करणे

3. वाहनतळ दर निश्चितीबाबत धोरण व अभ्यास

4. वाहतूक चिन्हे व फलक यासंबंधीची कार्यवाही

5. वाहनतळाच्या अनुषंगाने विविध स्तरीय संवाद साधणे व वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे

6. वाहन व्यवस्थापनासाठी माहिती तंत्रज्ञान आधारित संगणकीय बाबींचा अवलंब करणे

7. शहरातील शासकीय, व्यवसायिक व निवासी इमारतींमधील वाहनतळ जागांचा सुयोग्य वापर करण्याच्या दृष्टीने ‘वाहनतळ विषयक माहितीचा साठा’ (City Parking Pool) तयार करणे

8. वाहन विषयक बाबींची सुयोग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने ‘वाहनतळ मार्शल’ यांची नेमणूक करण्याविषयी अभ्यास

9. विकास आराखड्यातील वाहनतळ आरक्षणाबाबत कार्यवाही करणे

10. भंगार झालेल्या किंवा वापरात नसलेल्या वाहनांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३ ठिकाणी व्यवस्था करणे

11. भूमिगत वाहनतळ तसेच उड्डाणपुलाखालील जागांचा वापर याबाबत अभ्यास करणे इत्यादी

संबंधित बातम्या

पीक विम्याबाबत राज्य सरकारचं केंद्राला पत्र; शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या, ‘सह्याद्री’वरील बैठकीत शरद पवारांची सूचना

राज्यात फलोत्पादनवाढीसाठी दिलेल्या शरद पवारांच्या सूचनांवर अंमलबजावणी करणार : अजित पवार

Municipal new policy on new parking issue; The experiment will take place in three wards

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.