VIDEO: अरुण बेकसूर हाये… त्याच्यावरचे आरोप खोटे हाय; अरुण राठोडच्या आईचा टाहो

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर अरुण चव्हाणचं एका मंत्र्यासोबत संभाषण असलेल्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. (my son is innocent, arun rathod mother's first reaction on Pooja Chavan Suicide Case)

VIDEO: अरुण बेकसूर हाये... त्याच्यावरचे आरोप खोटे हाय; अरुण राठोडच्या आईचा टाहो


बीड: माझा अरुण बेकसूर हाय… त्याच्यावरील संमदे आरोप खोटे हाय… असा टाहोच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित अरुण राठोडच्या आईने फोडला. पण अरुण नेमका कुठे आहे हे त्यांनाही माहीत नसल्याचा दावा अरुणच्या आईने केल्याने अरुण नेमका कुठे आहे? असा सवाल निर्माण झाला आहे. (my son is innocent, arun rathod mother’s first reaction on Pooja Chavan Suicide Case)

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर अरुण चव्हाणचं एका मंत्र्यासोबत संभाषण असलेल्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर अरुणचे कुटुंबीय गायब झाले होते. आज चार दिवसानंतर बीड जिल्ह्यातील परळी येथील धारावती तांडा येथील घरी अरुणचे कुटुंबीय परतले आहेत. यावेळी अरुणच्या आईशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अरुण निर्दोष असल्याचं सांगितलं.

काय म्हणाली अरुणची आई

‘टीव्ही 9 मराठी’च्या प्रतिनिधींनी अरुण राठोडच्या धारावती तांडा या गावी जाऊन त्याच्या आईची प्रतिक्रिया जाणून घेतली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुणचं नाव येत आहे. तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? असा सवाल अरुणच्या आईला विचारण्यात आला. त्यावर हे संमद खोटं आहे. काहीही खरं नाही. तो पूजाबद्दल आमच्याशी कधीच बोलला नाही, असं त्याची आई म्हणाली. अरुण बेकसूर आहे. त्याला या प्रकरणात गोवलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला. अरुण कुठे आहे? असा सवाल केल्यावर आम्हाला माहीत नाही तो कुठे आहे? त्याच्याशी काही बोलणंही झालं नाही, असं त्या म्हणाल्या. यावेळी अरुणच्या आईची मनस्थिती ठिक नसल्याचं दिसून आलं.

दोन दिवसात माध्यमांसमोर येईल

अरुणचं कुटुंब गावात आलं असलं तरी अरुण मात्र अद्याप आलेला नाही. अरुण दोन दिवसात माध्यमांसमोर येईल, असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं. मात्र, अरुण नेमका कुठं आहे? कुणासोबत आहे? तो समोर का येत नाही? असा सवाल करण्यात आला असता त्यांच्या नातेवाईकांनी बोलण्यास नकार दिला.

कोण आहे अरुण राठोड?

अरुण राठोड हा वनमंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता आहे. तो संजय राठोड यांच्या अत्यंत जवळचा असून राठोड यांच्या सर्व खासगी गोष्टी अरुणला माहीत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. संजय राठोड यांच्या घरी, कार्यालयात आणि मंत्रालयातही अरुणचा मुक्त संचार असल्याने तो मंत्र्याचा किती जवळचा आहे. अरुण हा बीड जिल्ह्यातील परळीच्या दारावती तांडा येथील रहिवासी आहे. तो पुण्यात पूजा सोबत राहत होता. पूजाला काय हवं नको ते देण्याचं काम त्याच्याकडे होतं असं सूत्रांनी सांगितलं. पूजाच्या राहण्याची व्यवस्था मंत्रिमहोदयांनी अरुण राठोड याच्याकडे सोपवली होती. अरुण राठोड आणि पूजा चव्हाण याचे कोणतेही रिलेशन नाही. ते नातेवाईक नसल्याचे बोलले जात आहे. (my son is innocent, arun rathod mother’s first reaction on Pooja Chavan Suicide Case)

संबंधित बातम्या:

संजय राठोडांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्येच उभी, मीडियाशी बोलू नका; शिवसेना नेत्यांना तंबी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत बोलले, पण…

पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशाने झाला? वाचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

(my son is innocent, arun rathod mother’s first reaction on Pooja Chavan Suicide Case)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI