तरुण कोरोनाग्रस्तासाठी रुग्णालयातील बेड सोडला, नागपुरातील 85 वर्षीय वृद्धाचे तीन दिवसांनी निधन

नागपुरात राहणाऱ्या 85 वर्षीय नारायण दाभाडकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. (Nagpur Narayan Dabhadkar Hospital Bed)

तरुण कोरोनाग्रस्तासाठी रुग्णालयातील बेड सोडला, नागपुरातील 85 वर्षीय वृद्धाचे तीन दिवसांनी निधन
नारायण दाभाडकर
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 12:52 PM

नागपूर : तरुण कोरोनाग्रस्ताला बेड मिळावा, यासाठी नागपुरातील 85 वर्षीय वृद्धाने आपला बेड सोडला. आयुष्याचा उपभोग घेऊन झाला, तरुणाचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य आहे, असं म्हणत नारायण भाऊराव दाभाडकर (Narayan Rao Dabhadkar) यांनी रुग्णालयातील बेड सोडला. मात्र दोनच दिवसात दाभाडकरांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nagpur 85 years old Narayan Rao Dabhadkar gave up Hospital Bed for Corona Patient Dies after 3 days)

नागपुरात राहणाऱ्या 85 वर्षीय नारायण दाभाडकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. त्यांची ऑक्सिजन लेव्हल 60 पर्यंत पोहोचली होती. मुलगी आणि जावयाने तिला इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. बऱ्याच वेळानंतर त्यांना बेड मिळाला. त्याचवेळी एक महिला आपल्या 40 वर्षीय पतीला वाचवण्यासाठी बेड शोधत असल्याचं त्यांना समजलं. मात्र बेडअभावी रुग्णालयाने त्यांना दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. रडणाऱ्या महिलेला पाहून दाभाडकरांना पाझर फुटला.

बेड स्वेच्छेने सोडत असल्याचं पत्र

“मी 85 वर्षांचा झालोय, आयुष्याचा भरभरुन उपभोग घेतला, जर त्या महिलेच्या पतीचे निधन झाले, तर तिची मुलं अनाथ होतील. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य आहे” अशा भावना दाभाडकरांनी व्यक्त केल्या. मी माझा बेड स्वेच्छेने दुसऱ्या रुग्णासाठी सोडत आहे, असे पत्र त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. दाभाडकर घरी परतले, मात्र तीनच दिवसात राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवराजसिंह चौहानांकडून कौतुक

नारायण दाभाडकर हे आरएसएसचे स्वयंसेवक होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही त्यांच्या त्यागाचं कौतुक करत मानवंदना दिली आहे.

संबंधित बातम्या :

शेवटचे गुड मॉर्निंग, कोरोनाने निधनापूर्वी मुंबईतील महिला डॉक्टरची फेसबुक पोस्ट

पंकजा मुंडेंच्या अंगरक्षक भावाचं कोरोनानं निधन, ट्विट करत माहिती

(Nagpur 85 years old Narayan Rao Dabhadkar gave up Hospital Bed for Corona Patient Dies after 3 days)

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.