शिवनेसेनेला देव सदबुद्धी देवो, भाजप कार्यकर्त्यांचं होमहवन

शिवनेसेनेला देव सदबुद्धी देवो आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, यासाठी नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून पुजा आणि हवन करण्यात आलं

शिवनेसेनेला देव सदबुद्धी देवो, भाजप कार्यकर्त्यांचं होमहवन

नागपूर : शिवनेसेनेला देव सदबुद्धी देवो आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, यासाठी नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून पुजा आणि हवन करण्यात आलं (BJP Supporters Pooja). नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिरात ही पुजा करण्यात आली. भाजप नेते भुषण शिंगने यांनी या पुजेचं आयोजन केलं होतं (Nagpur BJP).

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता सर्वच राजकीय पक्ष चिंतेत आहेत. कुणाचं सरकार येणार, मुख्यमंत्री कोण होणार? ( Maharashtra next CM) यावरुन अनेक खलबतं सुरु आहेत. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीचं सरकार अजूनही स्थापन न झाल्याने महायुतीचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. त्यासाठी आता कार्यकर्त्यांनी होमहवन करण्यास सुरुवात केली आहे.

नागपुरातील कल्याणेश्वर मंदिरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पुजा आणि हवन करण्यात आलं. शिवसेनेला सदबुद्धी यावी आणि त्यांनी पुन्हा भाजपशी जुळवून घ्यावं, तसेच, देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हे होम-हवन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या हातात शिवसेनेला सदबुद्धी दे भगवान अशा आशयाचे बॅनरही दिसले.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांना मंगळ, भाजप आमदाराकडून अंमळनेर मंदिरात महाभिषेक

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला जनादेश मिळाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. परंतु मुख्यमंत्रिपदावरुन युतीत घोडे अडल्याने महायुतीची सत्ता स्थापन होण्यास विलंब होत आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवस उलटले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख अद्यापही ठरलेली नाही. त्यामुळे आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कार्यकर्ते अशाप्रकारे देवाकडे साकडं घालत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *