CCTV VIDEO | नागपुरात माजी नगरसेवकाच्या घरी चोरी, बंदुकीच्या धाकाने पत्नीची लूटमार

घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा साधारण दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार करण्यात आली आहे (Nagpur Former Corporator House theft )

CCTV VIDEO | नागपुरात माजी नगरसेवकाच्या घरी चोरी, बंदुकीच्या धाकाने पत्नीची लूटमार
नागपुरात माजी नगरसेवकाच्या घरी चोरी


नागपूर : नागपुरात माजी नगरसेवकाच्या घरी लूटमारीची घटना घडल्याचं समोर आलं आहे. दोघा चोरांनी घरात प्रवेश करुन बंदुकीच्या धाकाने चोरी केली. घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. (Nagpur Former Corporator House theft CCTV Video)

बंदुकीच्या धाकाने पत्नीची लूटमार

नागपूर जिल्ह्यातील उमरेड भागात माजी नगरसेवक अरुण गिरटकर यांच्या घरी लूटमार झाली. काल सायंकाळी गिरटकर फिरायला बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी एकटीच घरात होती. सायंकाळी 7:30 ते 7:45 वाजताच्या दरम्यान दोन चोरटे घरात शिरले. चोरांनी माजी नगरसेवक अरुण गिरटकर यांच्या पत्नीच्या डोक्यावर बंदूक लावली. बंदुकीच्या धाकाने चोरट्यांनी घरी चोरी केली.

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चोरांचा शोध

घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा साधारण दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार करण्यात आली आहे. उमरेड पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडीओ :

धुळ्यात डीवायएसपींच्या घरी चोरी

धुळे जिल्ह्यातील साक्री शहरातील प्रगती नगरातील प्लॉट क्र. 14/01 मध्ये डीवायएसपी प्रदीप भीवसन मैराळे राहतात. काही दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. घराच्या कंम्पाऊंडच्या गेटचे कुलूप चोरट्यांनी तोडले. त्यानंतर घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातील कपाटाचे लॉक तोडून 35 हजार रुपयांचे सोन्याचे एक तोळ्याचे मणी मंगळपोत, दोन लाख 10 हजार रुपयांचा सहा तोळ्याचा सोन्याचा चपला हार, दोन लाख 10 हजारांच्या सोन्याच्या सहा तोळ्याच्या दोन बांगड्या, 10 हजार 500 रुपयांचे तीन ग्रॅम सोन्याचे लहान मुलांच्या कानातील बाळ्या आणि एक लाख 50 हजारांची रोकड असा एकूण 6 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी सायंकाळी घरफोडीची घटना उघडकीस आली

याप्रकरणी डीवायएसपी प्रदीप मैराळे यांच्या तक्रारीवरुन साक्री पोलिसात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह पथकाने घटनास्थळी पाहणी केली. तसेच, श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

ड्रेसवर सोन्याचे दागिने न शोभल्याने वधूने पर्समध्ये ठेवले, चोरट्यांनी 16 लाखांच्या दागिन्यांसह पर्स पळवली

पोलीस अधिकाऱ्यांची घरं दरोडेखोरांच्या निशाण्यावर, धुळे डीव्हायएसपींच्या घरातून सहा लाखांचा ऐवज लंपास

(Nagpur Former Corporator House theft CCTV Video)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI