NMC Election Results 2026 LIVE: नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक-09 आणि प्रभाग क्रमांक -10 मध्ये कोण विजयी? निकाल एका क्लिकवर!

Nagpur Municipal Corporation NMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : 2017 साली नागपूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती. बसपानेही येथे चांगली कामगिरी केली होती.

NMC Election Results 2026 LIVE: नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक-09 आणि प्रभाग क्रमांक -10 मध्ये कोण विजयी? निकाल एका क्लिकवर!
NAGPUR MUNICIPAL CORPORATION ELECTION RESULT
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 1:04 AM

NMC Election Results 2026 LIVE : सध्या राज्यात महानगरपालिकांची निवडणूक चालू आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार आणि कोणाला दणका बसणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत नागपूर महानगपालिकेत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाने पूर्ण जोर लावलेला आहे. नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक दहामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागपुरात सध्याची स्थिती काय आहे?

नागपूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. यातील 37 प्रभागात प्रत्येकी 4 उमेदवार आहेत. तर एका प्रभागात 3 उमेदवार आहेत. नागपुरात एकूण 151 जागांसाठी निवडणूक होत आहे. 2017 साली येथे भाजपाची सत्ता होती. या निवडणुकीत भाजपाने भाजप 108 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला फक्त 29 जागांवर विजय मिळवता आला होता. नागपुरात बसपाने मोठी कमाल केली होती. येथे बसपाचा एकूण दहा जागांवर विजय झाला होता. शिवसेनेला दोन जागांवर विजय मिळाला होतो. राष्ट्रवादीला एक आणि अपक्ष पक्षाला एक जागा मिळाली होती.

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

सध्याचे जागावाटप कसे आहे?

नागपूर महानगरपालिकेत भाजपा एकूण 143 जागा लढवत आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाने एकूण 8 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी एकूण 96 जागा लढवत आहे. दुरीकडे काँग्रेस पक्षाने एकूण 151 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. ठाकरे गटानेही 56 जागांसाठी उमेदवार दिले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी 79 जागा लढवत आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षानेही 75 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. यावे मनसेनेही 22 जागा लढवण्याचे ठरवले आहे. एमआयएम पक्षाने 3 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. बसपा हा पक्ष एकूण आठ जागा लढवत आहे.

2017 साली प्रभाग क्रमांक 09 मध्ये कोणाचा विजय?

प्रभाग क्रमांक 09 मध्ये एकूण चार जागा आहेत. यातील प्रभाग क्रमांक 09 अ या जागेवर काँग्रेस पक्षाच्या स्नेहा निकोसे यांचा विजय झाला होता.. प्रभाग क्रमांक 09 मधील ब मध्ये बहुजन समाज पक्षाचे संजय बुरेार यांचा विजय झाला होता. त्यानंतर 09 व्या वॉर्डमधील क जागेवर बहुजन समाज पक्षाच्या ममता सहारे विजयी झाल्या होत्या. तर ड या जागेवरदेखील बसपाचे नरेंद्र वालदे विजयी झाले होते.

2017 साली प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोणाचा विजय झाला?

प्रभाग क्रमांक दहामधील अ जागेवर काँग्रेसच्या साक्षी राऊत विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक दहामधील ब या जागेवर काँग्रेसच्या रश्मी धुर्वे विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक दहामधील क जागेवर काँग्रेसचे नितीश गवालबन्सी विजयी झाले होते. तर प्रभाग क्रमांक दहामधील ड या जागेवर काँग्रेसचे गर्जी प्रशांत चोप्रा यांनी बाजी मारली होती.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

नागपूर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE