AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur South West Election Results 2024: फडणवीसांच्या गडात काँग्रेसने उभे केले आव्हान, पण बाजी….

Devendra Fadnavis Assembly constituency Election Results: मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. या मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी कोण बाजी मारणार...

Nagpur South West Election Results 2024: फडणवीसांच्या गडात काँग्रेसने उभे केले आव्हान, पण बाजी....
devendra fadnavis
| Updated on: Nov 23, 2024 | 2:49 PM
Share

Nagpur South West Devendra Fadnavis Assembly constituency Election Results: महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते, मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठे आव्हान नव्हते. काँग्रेसच्या प्रफुल गुडधे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रसिद्ध चेहरा, जनसंपर्क, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आणि भाजपचे कार्यकर्ते या बळावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली. विसाव्या फेरीत देवेंद्र फडणवीस यांना 90595  मते मिळाली होती. काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुघगे यांना 63209 मते होती. त्यानंतर राहिलेल्या फेऱ्यांमध्ये फडणवीस यांनी आघाडी घेत विजय मिळवला.

का होते या मतदार संघाचे महत्व

भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर आहे. यामुळे या ठिकाणी असलेल्या लढतीकडे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण राज्याची आणि महायुतीची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांना पूर्ण लक्ष या मतदार संघाकडे देता आले नाही. परंतु त्यांच्याकडे असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फळीमुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनाच मतदारांनी पसंती दिली.

असा आहे इतिहास

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघाची निर्मिती 2009 मध्ये झाली. परंतु त्यापूर्वी ज्या भागात हा मतदार संघ होता, त्याठिकाणी भाजपचे वर्चस्व होते. 1978 पासून मतदार संघात 7 वेळा भाजपने वर्चस्व राखले. 2 वेळा काँग्रेस भाजपला रोखण्यात यशस्वी ठरले. आता 2024 च्या निवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच झाली. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भाजपला ६५ हजार मतांची आघाडी मिळाली होती. परंतु २०२४ मध्ये ही आघाडी केवळ ३३ हजार मतांची होती. यामुळे काँग्रेसने फडणवीस यांच्यासमोर खरंच आव्हान उभे केले? अशी चर्चा सुरु होती. परंतु या ठिकाणी फडणवीस यांचाच विजय झाला.

नागपूर दक्षिण कागल विधानसभा निवडणूक निकाल 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.