ऑक्सिजन मास्क फेकून देत कोरोनाग्रस्ताचे पलायन, रुग्ण अजूनही बेपत्ता; नागपुरातील धक्कादायक प्रकार

ऑक्सिजन मास्क फेकून देत कोरोनाग्रस्ताचे पलायन, रुग्ण अजूनही बेपत्ता; नागपुरातील धक्कादायक प्रकार
प्रातिनिधिक फोटो

नागपूरच्या मेयो शासकीय रुग्णालयातून एक कोरोनाबधित रुग्ण पळून गेल्याचा प्रकार घडला आहे. (corona patient nagpur hospital)

prajwal dhage

|

Apr 22, 2021 | 3:46 PM

नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोज हजारो नवे रुग्ण आढळत असल्यामुळे येथे आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जमेल त्या पद्धतीने कोरोनाला (Corona) थोपवण्यासाठी डॉक्टर्स जीवाची बाजी लावत आहेत. मात्र, दुसरीकडे डॉक्टरांना उपचारासाठी सहकार्य मिळत नसल्याचेसुद्धा दिसत आहे. नागपूरच्या मेयो शासकीय रुग्णालयातून (Nagpur hospital) एक कोरोनाबधित रुग्ण पळून गेल्याचा प्रकार घडला आहे. सोमेश्वर नामदेवराव फुटाणे असे 53 वर्षीय रुग्णाचे नाव आहे. (Corona patient from Maharashtra Nagpur hospital escaped still not found)

ऑक्सिजन मास्क काढून रुग्ण बेपत्ता

नागपूरच्या मेयो रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण नव्याने भरती होत आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आणि नव्याने भरती होणाऱ्या रुग्णांचा आकडा जास्त अशी परिस्थिती येथे आहे. त्यामुळे जमेल त्या पद्धतीने डॉक्टर या रुग्णांवर उपचार करत आहेत. मोठ्या मुश्किलीने रुग्णांना बेड भेटत आहेत. मात्र, ज्या रुग्णांना बेड भेटले आहेत, ते रुग्णसुद्धा निट उपचार घेत नसल्याचे दिसून येत आहे. याच मेयो रुग्णालयात उपचार सुरु असताना एक रुग्ण नाकावरचे ऑक्सिजन मास्क काढून बेपत्ता झाला आहे. सोमेश्वर नामदेवराव फुटाणे असे या रुग्णाचे नाव असून तो 53 वर्षांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण काल (21 एप्रिल) पासून बेपत्ता आहे. तो नेमका कोठे आहे, याचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये.

माहिती देण्यास रुग्णालयाचा नकार

या रुग्णावर मागील अनेक दिवसांपूसन नागपुरातील मेयो रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला कृत्रिम ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर ठेवण्यात आले होते. मात्र, कालपासून तो ऑक्सिजन मास्क काढून आपल्या बेडवरून बेपत्ता झाला आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाला विचारले असता रुग्णालयाने कानावर हात ठेवत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

नागपुरात रुग्णांची संख्या 3 लाख 43 हजारांवर

दरम्यान, नागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. नागपुरात काल (21 एप्रिल) तब्बल 7 हजार 229 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 7 हजार 266 जणांची एका दिवसात कोरोनावर मात केली आहे. या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 43 हजार 589 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 65 हजार 457 जणांनी कोरोनावर मात केलीय. तर नागपुरात आतापर्यंत 6 हजार 575 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या आकडेवारीत आजच्या रुग्णांचीसुद्धा भर पडेल.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : नाशकात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाणची संख्या 7000 वर

VIDEO: नाशिकला दत्तक घेतो, शहराचा चेहरामोहराच बदलून टाकेन; फडणवीसांच्या ‘त्या’ आवेशपूर्ण भाषणावरुन काँग्रेसचा खोचक टोला

कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून, वाशिमच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

(Corona patient from Maharashtra Nagpur hospital escaped still not found)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें