AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला ड्रॅगन पॅलेसमधील मेडिटेशन सेंटरमध्ये गर्दी नसताना 1 तास बसायचंय: नितीन गडकरी

भगवान बुद्धांचा विचार फक्त बौद्धच नाही तर इतर लोकांचं सुद्धा कल्याण करणारा आहे. ड्रॅगन पॅलेस हे मेडिटेशन करण्यासाठी सगळ्यात उत्तम ठिकाण आहे. (i want to seat in dragon palace for meditation, says nitin gadkari)

मला ड्रॅगन पॅलेसमधील मेडिटेशन सेंटरमध्ये गर्दी नसताना 1 तास बसायचंय: नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 2:25 PM
Share

नागपूर: भगवान बुद्धांचा विचार फक्त बौद्धच नाही तर इतर लोकांचं सुद्धा कल्याण करणारा आहे. ड्रॅगन पॅलेस हे मेडिटेशन करण्यासाठी सगळ्यात उत्तम ठिकाण आहे. मलाही ड्रॅगन पॅलेसमधील मेडिटेशन सेंटरमध्ये कोणतीही गर्दी न करता 1 तास बसायचं आहे, अशी इच्छा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे धम्म चक्रपरिवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितीन गडकरी बोलत होते. भगवान बुद्धांचा विचार फक्त बौद्धच नाही तर इतर लोकांचं सुद्धा कल्याण करणारा आहे. ड्रॅगन पॅलेस हे मेडिटेशन करण्यासाठी सगळ्यात उत्तम ठिकाण आहे. मला ड्रॅगन पेलेसमधील मेडिटेशन सेंटरमध्ये कोणतीही गर्दी न करता 1 तास बसायचं आहे, अशी इच्छा व्यक्त करतानाच दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसपर्यंत मोठा निधी मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पोहोचविला, असं गडकरी म्हणाले.

नेहमी तुमच्यासोबत राहू

प्रत्येकाच्या पोटाला खायला मिळालं की काम चांगलं होतं. चिंधी वेस्ट मटेरियलपासून कार्पेट बनविण्याच काम नागपुरात सुरू झालं आहे. त्याला मोठी मागणी आहे. रोजगार वाढविण्यासाठी काम केलं जातं आहे . कोणीही माणूस जातीने मोठा नसतो. गुणांनी मोठा असतो. त्यामुळे जातीभेद नको. हे स्थळ जगातील क्षेत्रातील मोठं स्थळ व्हावं यासाठी शुभेच्छा आहेत. आम्ही नेहमी तुमच्यासोबत राहू, असं गडकरी म्हणाले.

मोदींच्या हस्ते बुद्धिस्ट सर्किटचं उद्घाटन

बुद्धांचा संदेश हा जागाच कल्याण करणारा आहे. जगातील जटिल प्रश्न सुद्धा बुद्धाच्या विचाराने सुटू शकतात. बुध्दाशी संबंधित असलेल्या सगळ्या ठिकाणांना जुळणारे रस्ते बांधण्याची संधी मला मिळाली. या बुद्ध सर्किटच लवकरच पंतप्रधान यांच्या हस्ते उदघाटन होईल, असं नितीन गडकरी म्हणाले.

ड्रॅगन पॅलेस मन:शांतीचं केंद्र

ड्रॅगन पॅलेस हे प्रत्येकाला मन:शांती देणारे ठिकाण आहे. ड्रॅगन पॅलेसमध्ये अनेक उपक्रम सुरू आहे. सुलेखा कुंभारे यांनी हे कार्यक्रम घडवून आणले आहेत. त्यामुळेच त्यांच्यासोबत आमचं नावही चालत राहील, असं सांगतानाच बुद्धिष्ट थीम पार्कचा प्रकल्प सुद्धा या ठिकाणी निश्चित होईल याची ग्वाही देतो, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आठवलेंची पुन्हा ऐक्याची हाक

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवितेने भाषणाची सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री हवे होते या विजय दर्डा यांच्या बोलण्यावर आठवले यांनी मिष्किल भाष्य केलं. फडणवीस आताही मुख्यमंत्री होऊ शकतात. तुम्ही या सरकारमधला एक बाहेर काढा. फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं आठवले यांनी म्हणताच एकच खसखस पिकली. भाजप सोबत आम्ही आहोत. करण भाजप जनतेसाठी काम करत आहे. भाजप आरक्षणाच्या विरोधात नाही. ते नेहमी दलित जनतेच्या सोबत आहेत. सुलेखा कुंभारे तुम्ही आणि आम्ही भाजप सोबत आहोत, आता आपणही सोबत येऊ आणि सगळे रिपब्लिक गट एकत्र करूया, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

वादाच्या भोवऱ्यात असलेल्या रामदास कदमांचं उद्धव ठाकरेंना 6 पानी पत्रं, दसरा मेळाव्यातल्या हजेरीबाबतही मोठा निर्णय

‘मेळाव्याला बोलावलं नाही तर श्रोत्यांमध्ये बसणार,’ जानकर म्हणतात भाऊ म्हणून पंकजा मुंडेंच्या कायम पाठीशी

भगवान गड आणि गोपीनाथ गड बाबत माहीत आहे का?; वाचा, स्पेशल स्टोरी

(i want to seat in dragon palace for meditation, says nitin gadkari)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.