Maharashtra Winter Session 2022 Live : अधिवेशनाचा आजचा दिवस महत्त्वाचा, अनेक ठराव, प्रस्तावावर शिक्कामोर्तब?

| Updated on: Dec 30, 2022 | 5:57 AM

Maharashtra Winter Session 2022 Live : अधिवेशनाचा आजचा दिवस महत्त्वाचा, अनेक ठराव, प्रस्तावावर शिक्कामोर्तब?

Maharashtra Winter Session 2022 Live : अधिवेशनाचा आजचा दिवस महत्त्वाचा, अनेक ठराव, प्रस्तावावर शिक्कामोर्तब?
Maharashtra Assembly Winter SessionImage Credit source: tv9 marathi

नागपूर: हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. उद्या अधिवेशनाचं सूप वाजणार आहे. त्यामुळे आज हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचे ठराव आणि प्रस्ताव मंजूर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या महत्त्वाच्या दिवशी कोणते निर्णय घेतात आणि विरोधक सरकारला कसे धारेवर धरणार हे दिसणार आहे. या मोठ्या बातम्यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Dec 2022 08:40 PM (IST)

    चंद्रपुरात ट्रक-बसचा भीषण अपघात

    मुल-चंद्रपूर मार्गावर डोनी फाट्याजवळ ट्रक-बसचा भीषण अपघात

    अपघातात २५ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू तर ५ जण किरकोळ जखमी

    तेजस्विनी कोडवते (वय २५ वर्षे) असं मृत युवतीचे नाव

    मृतक गडचिरोली जिल्ह्यातील एकलपूर येथील रहिवासी

    चंद्रपूरकडून मूलकडे येणाऱ्या ट्रकने विरुध्द दिशेने येणाऱ्या बसला दिली धडक

    धडकेत मुलीचा हात तुटून पडला रस्त्यावर तर, डोक्याला लागला गंभीर मार

    ट्रकचालक घटना स्थळावरून ट्रक सोडून फरार

  • 29 Dec 2022 07:57 PM (IST)

    आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाला उद्यापासून होणार सुरुवात

    उस्मानाबाद :

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाला उद्यापासून होणार सुरुवात

    दुपारी 12 वाजता देवीच्या गाभाऱ्यात घटस्थापणेने होणार नवरात्र उत्सवला सुरुवात

    नवरात्र उत्सवात विविध अलंकार पुजा, 3 जानेवारीला जलदिंडी तर 6 जानेवारीला पौर्णिमाला होणार सांगता

  • 29 Dec 2022 06:46 PM (IST)

    पुण्यात दोन ट्रक दारु जप्त

    राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई

    31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कारवाई

    पुण्यात एक कोटी 70 लाखांची विदेशी दारू जप्त

    2 ट्रकमध्ये भरून ही दारू जप्त करण्यात आली

    याप्रकरणी 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले

  • 29 Dec 2022 04:34 PM (IST)

    डॉ. प्राची पवार यांच्यावरील जीवघेणा हल्ला पूर्वनियोजित कट

    नाशिक : डॉ. प्राची पवार दिवंगत आमदार वसंत पवार यांच्या कन्या,

    नाशिक ग्रामीण पोलीसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर,

    हत्येचा कट रचणाऱ्या तीन आरोपी नाशिक ग्रामीण पोलीसांनी केलं गजाआड,

    कोरोना काळात डॉ. पवार यांच्या रुग्णालयात आरोपीच्या आत्याचा झाला होता मृत्यू,

    डॉ. प्राची पवार यांची हत्या करण्यासाठीच सुपारी देऊन रचला होता कट.

  • 29 Dec 2022 03:54 PM (IST)

    वसई- तुनीषा आत्महत्या प्रकरणात वालीव पोलिसांचा तपास तीव्र गतीने

    आरोपी सिजान खानला तपासासाठी काढले बाहेर

    आज दोन मुलींचे ही नोंदविले जावाब

    सिजान खानने डिलीट केलेल्या वॉट्स अॅप चॅटिंगमधील अडीचशे पेजच्या डाटाचा तपास सुरू

  • 29 Dec 2022 03:16 PM (IST)

    फेरीवाले हटावा रस्ता वाचवा या मोहिमेअंतर्गत नवी मुंबईत मनसे आक्रमक

    नेरुळ वार्ड ऑफिस येथे चक्क वडापाव तयार करत मनसेने आंदोलन केलं

    नवी मुंबईत फेरीवाल्याचा सुळसुळाट वाढत चालला आहे

    फेरीवल्याचा सुळसुळाट वाढू नये यासाठी मनसे आक्रमक

  • 29 Dec 2022 02:53 PM (IST)

    फेरीवाले हटवा रस्ता वाचवा या मोहिमेअंतर्गत मनसे आक्रमक

    नवी मुंबई : नेरुळ वार्ड आफिस येथे चक्क वडापाव तयार करत मनसेने आंदोलन केल आहे,

    नवी मुंबईत फेरीवाल्याचा सुळसुळाट वाढत चालला आहे,

    फेरीवाल्यांचा सुळसुळाट वाढू नये यासाठी मनसे आक्रमक.

  • 29 Dec 2022 01:40 PM (IST)

    लवासा जमीन घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत

    नाशिक :  पवार कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ,

    याचिकेकर्त्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी,

    लवासा प्रकल्प बेकायदेशीर असल्याचं आरोप,

    फौजदारी स्वरूपाची जनहित याचिका दाखल,

    ॲड. नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका.

  • 29 Dec 2022 01:17 PM (IST)

    उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

    विधानभवनातील कामकाजानंतर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

    पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

    उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे एकाच गाडीतून विधानभवनाकडे रवाना

  • 29 Dec 2022 11:39 AM (IST)

    चंद्रकांत खैरे यांचे इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप

    चंद्रकांत खैरे यांचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप

    इम्तियाज जलील हा दुष्ट आणि तोडपाणी करणारा माणूस

    इम्तियाज जलील अनेक घोटाळे काढतो आणि सोडून देतो

    इम्तियाज जलील हा दुष्ट आणि चुकून निवडून आलेला माणूस

    घोटाळ्याचे आरोप करतो आणि तोडपाणी करून सोडून देतो

    इम्तियाज जलील याने, गुटखा, दारू, वक्फ बोर्ड, समांतर योजना असे घोटाळे काढले आणि सोडून दिले

  • 29 Dec 2022 10:48 AM (IST)

    विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

    50 खोके, माजलेत बोके, हकालपट्टी करा, हकालपट्टी करा, भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा

    विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक एकवटले

    अजित पवार यांचीही घोषणाबाजी, शिवसेनेचे आमदारही उपस्थित

  • 29 Dec 2022 10:12 AM (IST)

    अपघाताच्या निमित्ताने सापडल्या कोट्यवधींच्या बनावट नोटा

    नाशिक : अंबड परिसरात घडली धक्कादायक घटना,

    मद्यधुंद चालकाने दिली 3 वाहनांना धडक,

    पोलीस तपासात चालकाच्या गाडीत सापडल्या कोट्यवधींच्या बनावट नोटा,

    बनावट नोटा कुठून व कशा आल्या याचा तपास सुरू,

    मद्यधुंद चालक पोलिसांच्या ताब्यात,

    अंबड पोलीस करत आहेत तपास.

  • 29 Dec 2022 10:03 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा रामगिरी बंगल्यावर दाखल

    रामगिरी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार

    कॅबिनेट विस्तार आणि विधानसभेच्या कामकाजावर चर्चा होणार असल्याची माहिती

    उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे दोघेही आज रेशीम बागला एकत्र जाणार

  • 29 Dec 2022 09:21 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजचे नागपुरातील कार्यक्रम

    सकाळी 11 : विधानसभा कामकाज, विधान भवन

    दुपारी 12 : विधानपरिषद कामकाज, विधानभवन

    दुपारी 1 : लम्पि रोग व गोट पॉक्स या रोगाच्या प्रतिबंधात्मक लसीचे विकसित तंत्रज्ञान केंद्र सरकारच्या संस्थांकडून राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडे हस्तांतरण करण्याबाबत सामंजस्य करार, विधानभवन, नागपूर

    सायं. 6 : मंत्रिमंडळ बैठक, विधानभवन

  • 29 Dec 2022 09:01 AM (IST)

    विधान भवना बाहेरील कट आउट चेंज करण्यात आले

    नागपूर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोस्टर मोठे करण्यात आले,

    काल या ठिकाणी एकनाथ शिंदे चे कट आऊट होते लहान.

  • 29 Dec 2022 08:46 AM (IST)

    औरंगाबादेत फुटणार भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ

    भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा औरंगाबादेत फोडणार प्रचाराचा नारळ

    2 जानेवारीला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर फुटणार लोकसभा निवडणुकीचा नारळ

    2 तारखेला सायंकाळी 5 वाजता होणार जेपी नड्डा यांची जाहीर सभा

    2024 च्या लोकसभा निवडणुकीची औरंगाबादेतून होणार सुरुवात

    भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली माहिती

  • 29 Dec 2022 08:44 AM (IST)

    पुणे- 'लवासा प्रकरणात पवार कुटुंबियाविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश द्या'

    पुण्यातील लवासा प्रकरणात मूळ तक्रारदार नानासाहेब जाधव यांची मुंबई हायकोर्टात नव्यानं याचिका

    याचिकेत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुबियांचे निकटवर्तीय अजित गुलाबचंद यांच्याविरोधातही आरोप

    या याचिकेवर लवकरच मुंबई हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता

  • 29 Dec 2022 08:17 AM (IST)

    नव्या वर्षात मार्डचा राजव्यापी बेमुदत संप

    नव्या वर्षात मार्डचा राजव्यापी बेमुदत संप

    राज्यभरातील मार्डचे डॉक्टर एक जानेवारीपासून संपावर

    सीपीआय मधील 80 निवासी डॉक्टरांचा समावेश

    प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी मार्ड कडून संपाचा इशारा

    मार्ड संपावर ठाम राहिल्यास रुग्णसेवेवर होणार परिणाम

  • 29 Dec 2022 08:16 AM (IST)

    नव्या वर्षात औरंगाबाद शहरात सुरू होणार 5जी इंटरनेट सुविधा

    रिलायन्स जिओ कडून औरंगाबाद शहरात 5जी सेवेची घोषणा

    देशातील 5 शहरांमध्ये औरंगाबाद शहराचाही समावेश

    5 जी सुविधेमुळे औरंगाबाद शहरात होणार डिजिटल क्रांती

  • 29 Dec 2022 08:02 AM (IST)

    नाशिकचे ओझर विमानतळ अजूनही निर्बंधमुक्त

    कोरोना चाचणी करण्यासंदर्भात तूर्तास कोणताही निर्णय नाही,

    नाशिकवरून सध्या हैदराबाद आणि दिल्ली साठी विमानसेवा सुरू,

    दिल्ली आणि हैदराबाद येथे प्रवाशांची तपासणी केली जात असल्याने नाशिकमध्ये येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाचे म्हणणं.

  • 29 Dec 2022 07:58 AM (IST)

    आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष बदलणार

    शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवण्याचा निर्णय

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

    नवा शहराध्यक्ष निवडताना तो जुना आणि नव्यांचा मेळ घालणारा असावा, अशी अपेक्षा शहराध्यक्ष भारत जाधव यांनी व्यक्त केली

  • 29 Dec 2022 07:26 AM (IST)

    आता नाशिकमध्येही लवकरच 5 जी सेवा

    आता नाशिकमध्येही लवकरच 5 जी सेवा

    रिलायन्स जिओची सेवा सुरू करण्याची घोषणा

    नाशिकमध्ये 5 जी सेवा सुरू होण्याची होती प्रतीक्षा

    लवकरच अन्य कंपन्या देखील सेवा सुरू करण्याची शक्यता

  • 29 Dec 2022 06:25 AM (IST)

    शिंदे गटाने मुंबई पालिकेतील कार्यालयात दावा केल्याने ठाकरे गट आक्रमक

    अचानक कार्यालयच ताबा कसा घेऊ शकतात?

    पोलिसांनी कारवाई केली पाहिजे ठाकरे गटाची मागणी

  • 29 Dec 2022 06:21 AM (IST)

    विधानभवना समोर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कटआऊटची जोरदार चर्चा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआऊटपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटआऊट उंच

    भाजपने जाणूनबुजून फडणवीस यांचं उंच कटआऊट लावल्याची चर्चा

    सरकारमध्ये फडणवीसच वरचढ असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न

  • 29 Dec 2022 06:18 AM (IST)

    बेघरांसाठी बच्चू कडू यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

    घरकूल संदर्भात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक होऊन चांगला निर्णय घेतला जाईल, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

    पाल टाकून सुरू असलेल्या आंदोलना संदर्भात उद्या आम्ही निर्णय घेऊ

    ओबीसींसाठी स्वतंत्र घरकुल योजना व्हावी, यासंदर्भात जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे

  • 29 Dec 2022 06:12 AM (IST)

    उल्हासनगरात ट्रान्सफॉर्मरला लागली आग

    निजधाम आश्रमासमोरील ट्रान्सफॉर्मरला आग

    आगीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

    विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या ऑईल गळतीमुळं आग लागल्याची शक्यता

    अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

  • 29 Dec 2022 06:06 AM (IST)

    हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस, उद्या सूप वाजणार

    आजच्या दिवशी महत्त्वाचे ठराव आणि प्रस्ताव मंजूर होणार

    सरकारची रणनीती काय? विरोधकांची भूमिका काय? महाराष्ट्राचे लक्ष वेधले

Published On - Dec 29,2022 6:03 AM

Follow us
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.