MLC ELECTION नागपूर आणि अकोला थेट लढत होणार, नागपुरात बावनकुळे, भोयर यांच्यात सामना

कोल्हापूर आणि नंदूरबार-धुळे येथील जागांबाबत एकमत झाले. परंतु, नागपूर आणि अकोला-वाशीम-बुलडाणा विधान परिषदेच्या जागांबाबत एकमत होऊ शकले नाही.

MLC ELECTION नागपूर आणि अकोला थेट लढत होणार, नागपुरात बावनकुळे, भोयर यांच्यात सामना
चंद्रशेखर बावनकुळे आणि छोटू भोयर
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 3:22 PM

नागपूर : चार विधानपरिषद निवडणुकीच्या जागांपैकी कोल्हापूर आणि नंदूरबार-धुळे बिनविरोध होणार आहे. परंतु, नागपूर आणि अकोला येथील निवडणुका होणार आहे. नागपुरात काँग्रेसचे छोटू भोयर यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे छोटू भोयर यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान, काँग्रेसनं डमी उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी अर्ज मागे घेतला. तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीचा घोडेबाजार थांबवण्यासाठी बिनविरोध निवडणूक घेता येईल, या यासाठी प्रयत्न केले. कोल्हापूर आणि नंदूरबार-धुळे येथील जागांबाबत एकमत झाले. परंतु, नागपूर आणि अकोला-वाशीम-बुलडाणा विधान परिषदेच्या जागांबाबत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळं या दोन्ही ठिकाणी घोडाबाजाराला उधाण येणार आहे. आपले उमेदवार फुटू नये, यासाठी नगरसेवकांना आतापासून सहलीला नेण्याचं प्लॅनिंग भाजप आणि काँग्रेसनं सुरू केलंय.

नागपूर जिल्हा विधानपरिषद निवडणुकीत 556 मतदार आहेत. यात 60 मतांनी भाजपचं पारडं जड आहे. आम्ही 400 पेक्षा जास्त मतांनी ही निवडणूक जिंकू, असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रविण दटके यांनी व्यक्त केला होता. नागपूर जिल्ह्यात विधानपरिषद निवडणुकीत एकूण 556 मतदार आहेत. खबरदारी म्हणून काँग्रेसं आपल्या नगरसेवकांना सुरक्षितस्थळी नेणार असल्याची माहिती आहे. भाजपनंही तशी तयारी केली आहे. नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे जास्त नगरसेवक असले, तरीही काँग्रेस आणि भाजपकडूनंही खबरदारी घेतली जात आहे.

अकोल्यात बाजोरिया-खंडेलवाल यांच्या लढत

अकोला, वाशीम, बुलढाणा या -स्थानिक स्वराज्य संस्थेत गेल्या तीन टर्मपासून गोपिकिशन बाजोरिया यांचे वर्चस्व आहे. पण, यावेळी ते महाविकास आघाडीकडून या निवडणूक रिंगणात उतरले. भाजपाकडून वसंत खंडेलवाल यांची उमेदवारी असल्यानं या निवडणुकीत चुरस वाढली आहे.

संबंधित बातम्या

भाजपमध्ये संघाची घराणेशाही, तिथं संघाच्या विचाराचा माणूस वर जातो, नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

Video नागपुरात लेखी हमीपत्र न मिळाल्यानं खासगी बस परतल्या, बसची तोडफोड झाल्यास एसटी मंडळाचा जबाबदारी घेण्यास नकार

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.