AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरमध्ये डेंग्यूचा कहर रोखण्याचं आव्हान, महापालिकेकडे डेंग्यू चाचणी कीटचा तुटवडा

गेल्या 9 वर्षात प्रथमचं मोठ्या प्रमाणावर डेंग्यू रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत 708 रुग्ण आढळले आहेत. तर, 15 सप्टेंबरला नागपूरमध्ये डेंग्यूचे 93 रुग्ण समोर आले होते.

नागपूरमध्ये डेंग्यूचा कहर रोखण्याचं आव्हान, महापालिकेकडे डेंग्यू चाचणी कीटचा तुटवडा
डेंग्यूचे रुग्ण वाढले.
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 1:44 PM
Share

नागपूर: नागपूरमध्ये कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. मेडिकलच्या विद्यार्थ्यांपाठोपाठ पुण्याला प्रशिक्षणासाठी गेलेल्या 12 पोलिसांना कोरोना संसर्ग झाल्यानं नागपूरकरांची चिंता वाढली आहे. आता नागपूरकरांवर आणखी एक संकट आलं आहे. नागपुरात डेंग्यूचा कहर पाहायला मिळाला आहे. गेल्या 9 वर्षात प्रथमचं मोठ्या प्रमाणावर डेंग्यू रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत 708 रुग्ण आढळले आहेत. तर, 15 सप्टेंबरला नागपूरमध्ये डेंग्यूचे 93 रुग्ण समोर आले होते. नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग अ‌ॅलर्ट झाला असून पालिकेकडून घरांची तपासणी करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात देखील पालिकेकडून घरांची पाहणी करण्यात आली होती.

डेंग्यूचं निदान करण्याच्या कीटचा तुटवडा

नागपुरात डेंग्यूचा कहर वाढत असल्याचं चित्र आहे. 9 वर्षात प्रथमच यावर्षी 708 डेंग्यूचे रु्गण आढळले आहेत. महापालिकेकडे डेंग्यूचं निदान करणाऱ्या कीटचा तुटवडा असल्याचं समोरं आलं आहे. डेंग्यू संशयितांची 3500 नमुने प्रलंबित आहेत. त्यामुळे डेंग्यूचा कहर थांबविण्याचं मोठं आव्हान महापालिकेसमोर आहे.

15 सप्टेंबरला 93 रुग्ण वाढले

नागपूरात डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. नागपुरात एका दिवसांत 93 च्या वर रुग्ण आढळले आहेत. नागपूर महानगरपालिकेनं 8484 घरांची तपासणी केली आहे. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाला 24 तासांत 303 घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत.

डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने लोकांमध्ये भीती

नागूपरमध्ये कोरोना विषाणू ससंर्गाच्या रुग्णांची वाढ हळूहळू होत आहे. दुसरीकडं आता डेंग्यूनं ही डोकं वर काढलं आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यानं नागरिक धास्तावलेले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागपूरमधील मेडीकल आणि मेयोमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत.

ऑगस्ट महिन्यात 9800 घरात आढळल्या आळ्या

नागपूर शहरात आरोग्य विभागाला 9 हजार 800 पेक्षा जास्त घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या होत्या. त्यावेळी नागपूरकरांना कोरोना विषाणू संसर्गानंतर आता डेंग्यूला सामोरं जाव लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

सर्वेक्षणातून भयावह स्थिती उघड

नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून शहरात डेंग्यूची भयावह स्थिती उघड झाली होती. डेंग्यूच्या आळ्या आढळलेल्या घरांवर कारवाई होणार का? हा प्रश्न याउपस्थित होतं आहे.

1 लाख 85 हजार घरांचं सर्वेक्षण

नागपूर महापालिकेनं 1 लाख 85 हजार घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. नागपूर शहरात जानेवारी ते ऑगस्टपर्यंत 442 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूरमध्ये सर्व पोलिसांची RTPCR होणार

नागपूरमधील एमबीबीबएसचे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं प्रकरण ताजं असताना 12 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं नागपूरमध्ये खळबळ माजली होती. पुणे येथे ट्रेनिंग साठी गेलेल्या 12 पोलीस कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागपूर पोलीस दलाची चिंता वाढली आहे. 12 जणांना कोरोना झाल्याचं समोर येताच पोलीस दल अलर्ट झालंय. आतापर्यंत 500 पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. नागपूर पोलिस दलातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे.

इतर बातम्या:

नाशिकमध्ये डेंग्यू, चिकुन गुन्याचे थैमान; रुग्णांची संख्या तेराशेंच्या घरात

महावितरणला केवळ एक रुपयाच्या मोबदल्यात दिली दीड एकर जमीन, हजारोंच्या घरात प्रकाश

Nagpur Dengue Update 708 patient found in one year after last 9 years

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.