किरण सामंत रत्नागिरीतून माघार घेणार की नाही?; उदय सामंत यांचं मोठं विधान

Uday Samant on Kiran Samant Candidacy Ratnagiri Sindhudurg Loksabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कोण लढणार?; राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचं मोठं विधान... नागपुरात माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर...

किरण सामंत रत्नागिरीतून माघार घेणार की नाही?; उदय सामंत यांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 11:26 AM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा केला जात आहे. अशातच किरण सामंत यांनी आपण रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून माघार घेत असल्याची सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर नारायण राणे ही जागा लढतील, या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. अखेर ती पोस्ट किरण सामंत यांनी मागे घेतली आहे. यावर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपुरात बोलताना उदय सामंत यांनी पुन्हा एकदा रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर दावा केला आहे.

भावनिक निर्णय होता. आमचं सगळं बोलणं झालं. आमचा दावा आहे. आम्ही ती जागा लढवणार आहोत. गैरसमज दूर झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं आहे. ही जागा आपणच लढलो पाहिजे, अशी कार्यकर्त्यांच्या भावना आहे. त्यामुळे आमचा दावा आहे. किरण सामंत यांनी ट्विट सुद्धा मागे घेतलं आहे, असं उदय सामंत म्हणालेत.

ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात- सामंत

नाशिकच्या जागेवरून महायुतीत अद्यापही तिढा असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला आहे. अशात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे. याववरही उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. हेमंत गोडसे हे ठाकरे गटाच्या संपर्कात आहे म्हणाल… तर मी सांगतो ठाकरे गटाचे राहिलेले आठ आमदार माझ्या संपर्कात आहेत. मी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घालून देईल. लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील तेव्हा नाव सांगेन, असं उदय सामंत म्हणालेत.

दुपारी महायुतीची बैठक

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, निलेश राणे, आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. आज दुपारी ३ वाजता होणार कुडाळला महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. यात लोकसभेच्या उमेदवारीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.