नागपूरचे रसिक चोखंदळ! ज्येष्ठ दिग्दर्शक समर नखाते असं का म्हणालेत?

सहाव्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ दिग्दर्शक समर नखाते यांच्या उपस्थितीत समारोप झाला. युवकांपासून ज्येष्ठांनी चित्रपटांचा आस्वाद घेतला. यावेळी नागपूरचे रसिक चोखंदळ असल्याचं ज्येष्ठ दिग्दर्शक समर नखाते म्हणाले.

नागपूरचे रसिक चोखंदळ! ज्येष्ठ दिग्दर्शक समर नखाते असं का म्हणालेत?
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवर.
Image Credit source: tv 9
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 14, 2022 | 5:01 AM

नागपूर : पूर्ण क्षमतेने सुरू झालेले चित्रपटगृह (Cinema) आणि 16 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन यामुळे खऱ्या अर्थाने सहावा ऑरेंजसिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival) स्मरणीय ठरला. वैविध्यपूर्ण पूर्ण विषयांवरील दर्जेदार चित्रपट आणि दिग्दर्शक अभिनेते यांच्यासोबत दिलखुलास गप्पा यंदा प्रेक्षकांना करता आल्या. युवक-युवतींपासून ते ज्येष्ठ नागरिकांना चित्रपटांना गर्दी केल्याचे दिसून आले. एकूणच सहाव्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळं पुन्हा मोठ्या प्रमाणात महोत्सव करण्याची ऊर्जा मिळाल्याचे आयोजन समितीचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर मेश्राम (Dr. Chandrasekhar Meshram) यांनी सांगितले.

चित्रपटांमध्ये जग एकत्र आणायची ताकद

निवडक चांगल्या चित्रपटांना मिळालेला प्रतिसाद. सिनेमाविषयी जाणून घेण्याची आवड. युवा वर्गाचा उत्साह आणि चित्रपट अनुभवण्याची हौस यावरून नागपूरचे रसिक चोखंदळ असल्याचे ज्येष्ठ दिग्दर्शक समर नखाते यांनी सांगितले. सिनेमा साठी एकत्र आल्याने सोशल सेन्सिबिलीटी दिसून येत असे देखील ते म्हणाले. चित्रपटांमध्ये संपूर्ण जग एकत्र आणायची ताकद असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

सर्वच चित्रपट हाऊसफुल

या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण सोळा चित्रपट दाखविण्यात आले. सर्वच हाऊसफुल शो ठरले. आयोजन समितीचे सचिव विलास मानेकर आणि अन्य सदस्यांनी यासाठी प्रेक्षकांचे आभार मानले. महोत्सव अधिक कालावधीचा असावा अशी मागणी समारोपाच्या वेळी उपस्थित रसिकांनी केली. व्यवस्थापक चेतन जाधव नई व्ही आर मॉलचे व्यवस्थापक अशोक चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे म्हंटले आहे. नागपूर मनपाचेही यासाठी सहकार्य लाभले.

गोंदियाच्या बिरसीहून हैदराबादला थेट टेक ऑफ, आता मुंबई-पुणेचे विमान उड्डाण केव्हा?

Gold Price : आठवड्याभरात सोन्याच्या भावात मोठी घट, चांदीची चमकही घटली

मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण केव्हापर्यंत, सुनील केदारांनी सांगितली तारीख

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें