नागपूर मेट्रोत चेहरे पाहून नियुक्ती, महिला आरक्षणालाही हरताळ, राष्ट्रवादीच्या प्रशांत पवारांचा महामेट्रोवर आरोप

नागपूर मेट्रोमध्ये चेहरे पाहून नियुक्ती करण्यासोबतचं महिला आरक्षणाला हरताळ फासण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. महामेट्रोच्या पदभरतीत महिलांना 30 टक्के पद राखीव ठेवली गेली नाहीत, असा आरोप पवार यांनी मेट्रो प्रशासनावर केला आहे.

नागपूर मेट्रोत चेहरे पाहून नियुक्ती, महिला आरक्षणालाही हरताळ, राष्ट्रवादीच्या प्रशांत पवारांचा महामेट्रोवर आरोप
PRASHANT PAWAR NAGPUR METRO
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 10:35 AM

नागपूर: राज्याची उपराजधानी नागपूरमधील मेट्रो प्रकल्पात आरक्षण डावलून पदभरती घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केला होता. नागपूर मेट्रोमध्ये चेहरे पाहून नियुक्ती करण्यासोबतचं महिला आरक्षणाला हरताळ फासण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. महामेट्रोच्या पदभरतीत महिलांना 30 टक्के पद राखीव ठेवली गेली नाहीत, असा आरोप पवार यांनी मेट्रो प्रशासनावर केला आहे.

चेहरे पाहून मेट्रोत नोकरी

महामेट्रोकडून पदभरतीत महिला आरक्षणाला हरताळ फासण्यात आला असून मेट्रोमध्ये चेहरे पाहून नोकीर दिल्याचा गंभीर आरोप प्रशांत पवार यांनी केला आहे. मेट्रोत पदभरती करताना निकष पाळले नसल्याचा गंभीर आरोप देखील पवार यांनी केला आहे. महामेट्रोबाबत 24 ऑक्टोबरला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बैठक बोलावल्याची माहिती देखील पवार यांनी घेतली आहे.

मेट्रोतील भरतीवरुन विजय वडेट्टीवार आक्रमक

मेट्रोतील भरतीमध्ये आरक्षण डावलल्याप्रकरणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत. नागपूर मेट्रोमध्ये भरती करताना आरक्षण डावलल्याने ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार संतप्त झाले असून ‘बॅकलॅाग भरा अन्यथा कारवाईस तयार राहा’, असा इशारा त्यांनी मेट्रो प्रशासनाला दिला आहे.

मेट्रो प्रशासनावर एफआयर करणार

नागपूर मेट्रोनं ‘बॅकलॅाग भरला नाही तर मुख्यमंत्र्यांशी बोलून एफआयआर दाखल करणार’ असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले होते. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा नागपूर मेट्रोला इशारा देत या प्रश्नी मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेणार घेणार असल्याचं देखील सांगितलं होतं. ओबीसी, एससी, एनटींना डावलून ओपनच्या जास्त जागा भरल्या आहेत. ‘मंत्री असूनही मेट्रो विरोधात मोठी भूमिका स्वीकारणार’ असल्याचा इशारा देखील विजय वडेट्टीवार यांनी दिला होता. मेट्रो भरती घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचंही ते म्हणाले होते.

युवक काँग्रेसकडून मेट्रो भवनला घेराव

नागपूर मेट्रोमध्ये आरक्षणाला बगल देत खुल्या प्रवर्गातून अधिक उमदेवारांची निवड करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केला होता. पवार यांच्या आरोपानंतर विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. नागपूर मेट्रोत पदभरती करताना आरक्षण डावलले, आणि बहुजन समाजावर अन्याय केला, असा आरोप करत 9 सप्टेंबरला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं नागपूर मेट्रो भवनला घेराव घालण्यात आला होता.

नागूपर मेट्रोवर आरक्षणाला डावलल्याचा आरोप का?

नागपूर मेट्रोने आरक्षण धोरणाला बगल देऊन खुल्या प्रवर्गाला 357 जागा असताना प्रत्यक्षात मात्र तब्बल 650 जागा भरण्यात आल्या. तर 2015 ते 2021 या काळातील पदभरतीत ओबीसी, एससी आणि एनटी समाजावर मोठा अन्याय करण्यात आला, असा आरोप प्रशांत पवार यांनी केला होता. एससी प्रवर्गाच्या 132 जागा असताना केवळ 42 उमेदवारांना सेवेत घेण्यात आले आहे. तर एसटी प्रवर्गाच्या 66 जागा असताना फक्त 24 जणांना सेवेवर घेतलंय. ओबीसी समाजाच्या 238 जागा असताना फक्त 113 जणांना नोकरी देण्यात आली आहे, असं प्रशांत पवार यांनी आपल्या आरोपात म्हटलं आहे. तसेच या महामेट्रोच्या महापदभरती घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

नागपूर मेट्रोमधील प्रवर्गनिहाय पदसंख्या आणि भरलेली पदे

एससी जागा – 132 ( घेतले 42)

एसटी जागा – 66 ( घेतले 24 )

ओबीसी जागा – 238 ( घेतले 113 )

इडब्लूएस जागा – 88 ( घेतले 12)

खुला प्रवर्ग जागा – 357 ( घेतले -650)

इतर बातम्या:

नागपूर मेट्रोत ओबीसींना डावलल्याचा आरोप, मेट्रोनं चूक दुरुस्त करावी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आंदोलनाचा इशारा

नागपूर मेट्रोमध्ये पदभरती घोटाळा; ओबीसी, एससी, एनटीच्या उमेदवारांना डावलले, खुल्या प्रवर्गावर प्रशासन मेहरबान ?

NCP Leader Prashant Pawar accused Maha metro Nagpur Metro not follow Woman Reservation in Recruitment

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.