चंद्रपुरात दारुबंदी उठवल्याच्या दुसऱ्याच दिवशी 3 कोटीच्या दारुवर रोडरोलर फिरवला

राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. यानंतर दुसऱ्याच दिवशी चंद्रपूरमध्ये 3 कोटी रुपयांचा दारूसाठा रोडरोलर खाली घालून नष्ट करण्यात आला.

चंद्रपुरात दारुबंदी उठवल्याच्या दुसऱ्याच दिवशी 3 कोटीच्या दारुवर रोडरोलर फिरवला


चंद्रपूर : राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. यानंतर दुसऱ्याच दिवशी चंद्रपूरमध्ये 3 कोटी रुपयांचा दारूसाठा रोडरोलर खाली घालून नष्ट करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात ठिकाणी हा दारुसाठा नष्ट करण्यात आला. मागील 3 वर्षात केवळ घुग्गुस पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा 3 कोटी रुपयांचा दारूसाठा पकडण्यात आला होता. एकूण 388 दारूच्या गुन्ह्यात हा साठा जप्त करण्यात आला होता. यापुढच्या काळातही चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील मालखान्यात ठासून भरलेला दारूसाठा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे (Road roller on seized alcohol of 3 crore by Chandrapur police).

स्थानिक पोलीस ठाणे आणि उत्पादन शुल्क विभाग अधिकारी यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या एकूण दारूसाठ्याची किंमत 3 कोटी रुपये इतकी होती. हा दारूसाठा रोडरोलर खाली फोडून नष्ट करण्यात आला. मागील केवळ 3 वर्षात घुग्गुस पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा दारूसाठा पकडल्यानं दारूतस्करांची मजल कुठपर्यंत गेली होती हे लक्षात येतं. मात्र, न्यायालयीन आदेशानुसार आता पोलिसांनी हा संपूर्ण साठा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु केलीय, अशी माहिती घुग्गुस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांनी दिलीय.

पोलिसांनी केलेल्या कारवाईचे फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत. यात जप्त करण्यात आलेला पोलीस कस्टडीतील दारूसाठा रोडरोलर खाली घालून फोडल्यानंतर त्या ठिकाणी काचांचा ठिग साचलेला दिसत आहे. यानंतर सध्या चंद्रपूरमध्ये दारुबंदी हटवण्याच्या निर्णयासोबत या कारवाईचीही जोरदार चर्चा होत आहे.

हेही वाचा :

‘चंद्रपूरसाठी काळा दिवस, दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अपयशी?’ पद्मश्री बंग दाम्पत्याचा ठाकरे सरकारला सवाल

पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून काँग्रेसला दारुबंदीचं गिफ्ट : सुधीर मुनगंटीवार

सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवली, ठाकरे सरकाराचा मोठा निर्णय

व्हिडीओ पाहा :

Road roller on seized alcohol of 3 crore by Chandrapur police

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI