AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Vadettiwar: निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालंय…निकाल लांबणीवर पडताच विजय वडेट्टीवारांनी फुटपट्टीच काढली

Vijay Vadettiwar on Election Commission: नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीतील सावळ्या गोंधळावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयोगाला चांगलेच सुनावले आहे. त्यांनी आयोगाच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

Vijay Vadettiwar: निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालंय...निकाल लांबणीवर पडताच विजय वडेट्टीवारांनी फुटपट्टीच काढली
विजय वडेट्टीवारImage Credit source: गुगल
| Updated on: Dec 03, 2025 | 4:06 PM
Share

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगूल वाजला खरा पण नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीतील सावळ्या गोंधळावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंपासून ते इतर अनेक नेत्यांनी आयोगावर तोंडसूख घेतले आहे. त्यात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Congress Leader Vijay Vadettiwar) यांनी तर निवडणूक आयोगाचे मोजक्या शब्दात चांगले माप काढले. त्यांनी धारधार शब्दांची फुटपट्टीच लावली. त्यांनी निवडणूक आयोगाचा अशा शेलक्या शब्दांनी समाचार घेतला.

निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालं

राज्य निवडणूक आयोग, मला वाटतं की त्यांच्या अकलेची दिवाळे निघाले असे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रात अनेक निवडणुका झाल्या मात्र एवढा गोंधळ आणि पोरखेळ कधीच झाला नव्हता, मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्रात हा निवडणुकीचा धिंगाणा दिसतोय. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाअंतर्गत त्यावेळी कोणाच्या दबावात घाईघाईत तारखा घोषित केल्या. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की 50% च्या वर कुठले आरक्षण जाता कामा नये, असं असताना निवडणूक आयोगाने 50% च्या वर आरक्षणाच्या मर्यादा पाळल्या नाहीत, असा शब्दात त्यांनी राज्य निवडणूक आयोगाचा समाचार घेतला.

भाजपला विजयी घोषीत करा

सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून निवडणुका घेत आहोत, या सगळ्या लोकांना वेठीस धरणे, सात- आठ वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि त्याही व्यवस्थित न करणे यासाठी राज्य निवडणूक आयोग सोबत राज्य सरकारही जबाबदार आहे. उद्या ईव्हीएममध्ये छेडछाड झाली तर कोण जबाबदार? ईव्हीएम हॅक करता येतात, करा तुमच्या मनाप्रमाणे, निवडणुका घेताच कशाला? भाजपच्या लोकांना विजयी झाले म्हणून घोषीत करा असा जबरी टोला त्यांनी लगावला. आता अठरा दिवस जे मिळत आहेत. यातून लोकांचा विश्वास कसा राहील, त्यामुळे या सर्व प्रक्रियेत निवडणूक आयोग आणि राज्य सरकारही दोषी आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

या दोघांच्या सरकारचे लोक नेते जे बोलत आहेत, सरकारच्या इशाऱ्यावर चालणारा निवडणूक आयोग झाला आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाचे ज्ञानेश्वर यांनी सांगितला आहे जगात भारताच्या निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शीपणे होतात. हुकमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू झाली आहे हेच दिसतय, तारखा पुढे ढकलने निवडणूक आयोगाचा अपयशय आणि राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.

ओबीसींच्या जागा कमी कुणी केल्या?

27% आरक्षण दिलं असं बावनकुळे म्हणत आहेत. ते आरक्षण मग कुठे आहे, आम्ही जेव्हा डेटा गोळा केला, बांठीया आयोग तयार केला,तेव्हा आमच्यावर आरोप केले की आम्ही ओबीसी आरक्षण घालवलं. आता ओबीसींच्या जागा कमी होणार याला कोण जबाबदार आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. त्यामुळे कोणावर आरोप करताना वस्तुस्थिती मांडली पाहिजे, कोर्टाने आदेश दिला तर त्याचा नीट अभ्यास करायला पाहिजे. 20 दिवसानंतर निवडणूक घ्या म्हटलं तेव्हा सरकारने विरोध का नाही केला? कारण त्यांनाही तेच पाहिजे असेल. त्यांना अपयश मिळत होता म्हणूनच या निवडणुका लांबणीवर टाकल्या, भाजपच्या अंतर्गत सर्वे मध्ये 175 जागा जिंकत असल्याचा सर्वे होता, त्यामुळे हे फिक्सिंग आहे आणि तो सर्व लोकांना मूर्ख बनवण्यासाठी दाखवण्यात आल, अशी टीका ही वडेट्टीवार यांनी केली.

निवडणूक आयोगावर तोंडसूख

कोण ज्येष्ठ अधिकारी, सहायक निवडणूक आयुक्त, अतिरिक्त आयुक्त कोण आहे? कोणाच्या आदेशाची वाट पाहतोय आणि कोणाच्या आदेशाने तो आदेश काढतोय हे आम्हाला माहिती आहे. जर तुमची बुद्धी शाबूत होती तर सर्वोच्च न्यायालयाच्या नीट अभ्यास करायला पाहिजे होता. गेल्यावेळी 379 जागा रिकाम्या झाल्या होत्या पुन्हा आता हीच परिस्थिती झाली आहे, सर्व गोंधळ निवडणूक आयोगाने घातलाय आणि याचा आत्मचिंतन सत्ताधाऱ्यांनी केले पाहिजे असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.