AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थी युक्रेनमधून आणलेत, फार मोठा तीर मारला नाही; वडेट्टीवारांचा केंद्रावर हल्लाबोल

रशिया-युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धाची सर्वाधिक झळ युक्रेनला पोहोचली आहे. युक्रेनमधील अनेक इमारती मिसाईल हल्ल्यात नेस्तनाबूत झाल्या आहेत. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकल्याने त्यांना मायदेशी आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थी युक्रेनमधून आणलेत, फार मोठा तीर मारला नाही; वडेट्टीवारांचा केंद्रावर हल्लाबोल
30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थी युक्रेनमधून आणलेत, फार मोठा तीर मारला नाही; वडेट्टीवारांचा केंद्रावर हल्लाबोलImage Credit source: vijay wadettiwar twitter
| Edited By: | Updated on: Feb 28, 2022 | 11:59 AM
Share

नागपूर: रशिया-युक्रेनमध्ये (Russia Ukraine Crisis) भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धाची सर्वाधिक झळ युक्रेनला पोहोचली आहे. युक्रेनमधील अनेक इमारती मिसाईल हल्ल्यात नेस्तनाबूत झाल्या आहेत. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी (indian student) अडकल्याने त्यांना मायदेशी आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत भारताने केवळ 900 विद्यार्थी मायदेशी आणले आहेत. मात्र, त्यातही श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या श्रेयवादाच्या लढाईवर काँग्रेसे नेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी खोचक टीका केली आहे. युक्रेनमध्ये 30 हजार विद्यार्थी अडकले आहेत. त्यापैकी फक्त 900 मुलांना परत आणलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने फार मोठा तीर मारला नाही, अशी खोचक टीका करतानाच केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना केंद्रावर थेट हल्ला चढवला. युद्धजन्य परिस्थितीत इतर देशांनी आपले नागरिक मायदेशी नेले, आपण मात्र लवकर पावलं उचलली नाही. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याची गरज आहे. युक्रेनमध्ये 25 ते 30 हजार मुलं आहेत. 40 किमी प्रवास करून गेल्यानंतर थंडीत ते उघड्यावर झोपले. दोन विमाने आले म्हणजे सर्व विद्यार्थी आले असं होत नाही. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागेल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

ऑपरेशन गंगा वाहून जाता कामा नये

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सरकारी खर्चाने घरापर्यंत पोहोचवणार आहोत. केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे. ते वाहून जाता कामा नये. केंद्राने प्रत्येक विद्यार्थ्याला परत आणावे. पोलंडचे राजदूत मदत करत नाहीत. त्यांना ताकीद देण्याची गरज आहे. नाटोमध्ये भारतानं समर्थन न केल्याने युक्रेन भारतीय विद्यार्थ्यांना मदत करत नाही. याकडे त्वरीत लक्ष घालणं गरजेचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ओबीसी विद्यार्थ्यांची माथी भडकवली जात आहेत

ओबीसी आरक्षणावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणूक आयोगाने याचिका दाखल केली म्हणून सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलली आहे. आता बुधवारी ओबीसी आरक्षणावर सुनावणी होणार आहे. बुधवारी ओबीसींच्या बाजूनं निकाल लागेल अशी आशा आहे. ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, पण त्यातुलनेत निधी मिळत नाही. ओबीसी विद्यार्थ्यांचे माथी भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला.

राजे स्वयंप्रकाशित होते

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती शिवरायाला कुठल्या गुरुची गरज नव्हती. ते स्वयंनिर्माते होते. राजे स्वयंप्रकाशित होते. त्यांना गुरु लागत नाही. हिमालयात सर्वांना गुरु लागतो. राज्यपाल तिकडे असावेत. त्यांचं विधान शिवरायांचा अपमान करणारे आहे. समर्थ रामदास गुरु असते तर एखादा धडा गुरुवरंही असता, पण सर्व धडे शिवरायांवर आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Russia Ukraine War Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवलेल्या उच्चस्तरीय बैठकीला सुरुवात

Russia Ukraine War : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठक, यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षेला प्राधान्य

Video : युक्रेनच्या बॉर्डरवर भारतीयांना मारहाण, लाथा, बुक्क्या घालतानाचे व्हिडिओ व्हायरल

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.