Russia Ukraine War Live : रशियाला चीनचा पाठिंबा, रशिया-युक्रेन युद्धाबाबत सर्वात मोठी अपडेट

| Updated on: Mar 01, 2022 | 12:08 AM

Russia-Ukraine Crisis 2022 Live Updates and Latest News in Marathi : युक्रेन आणि रशियातील संर्घष शिगेला पोहोचला आहे. रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. या युद्धामध्ये आतापर्यंत सैन्यासह अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे युक्रेन देखील रशियाला चोख प्रतित्युत्तर देताना दिसून येत आहे. त्यामुळे पिरिस्थिती गंभीर बनलीये.

Russia Ukraine War Live : रशियाला चीनचा पाठिंबा, रशिया-युक्रेन युद्धाबाबत सर्वात मोठी अपडेट
दोन्ही देश चर्चेच्या टेबलावरImage Credit source: RT

Russia-Ukraine Crisis 2022 Live Updates and Latest News in Marathi : युक्रेन आणि रशियातील संर्घष शिगेला पोहोचला आहे. रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. या युद्धामध्ये आतापर्यंत सैन्यासह अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे युक्रेन देखील रशियाला चोख प्रतित्युत्तर देताना दिसून येत आहे. त्यामुळे पिरिस्थिती गंभीर बनलीये. युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पोलिश अध्यक्ष आंद्रेज डूडा यांच्याशी चर्चा केली. तीनही नेत्यांमध्ये सध्याच्या सुरक्षा परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पुढील काळात रशियाच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी संयुक्त पावले उचलण्यावर देखील सहमती दर्शविण्यात आली आहे. दरम्यान दुसरीकडे युक्रेनमध्ये अचानक युद्ध सुरू झाल्याने अनेक भारतीय विद्यार्थी तिकडे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना सुखरूपणे भारतात आणले जात आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Feb 2022 10:54 PM (IST)

    युक्रेनचा मोठा निर्णय

    युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनमध्ये युक्रेनच्या सदस्यत्वासाठी अर्जावर स्वाक्षरी केली आहे, अशी घोषणा युक्रेनच्या संसदेने केली.

  • 28 Feb 2022 09:18 PM (IST)

    युक्रेन-रशिया युद्धावर मोदींची बैठक

  • 28 Feb 2022 07:49 PM (IST)

    36 देशांच्या हावाई हद्दीत रशियाला बंदी

  • 28 Feb 2022 07:48 PM (IST)

    रशियाला चीनचा पाठिंबा

    रशियासोबतचे व्यवहार सुरू ठेवणार

    चीनच्या पाठिंब्याने रशियाचे बळ वाढले

    युक्रेनचा धोका वाढला

  • 28 Feb 2022 07:12 PM (IST)

    रशियाची हवाई हद्द 27 देशांसाठी बंद

    रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा जगाला फटका बसत आहे. रशियाने आता त्यांची हवाई हद्द सत्तावीस देशांसाठी बंद केली आहे. त्यात जर्मनी, स्पेन, इटली, आणि फ्रान्सचाही समावेश आहे.

    ⚡️ Russia is closing airspace to 27 nations – including Germany, Spain, Italy and France - Federal Air Transport Agency

    Subscribe to RT https://t.co/gtQwYY5p2N pic.twitter.com/ksXVIzMvMn

    — RT (@RT_com) February 28, 2022

  • 28 Feb 2022 07:08 PM (IST)

    युक्रेनियन लोकांची मदतीसाठी व्हाईट हाऊससमोर निदर्शनं

  • 28 Feb 2022 07:00 PM (IST)

    रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोठी अपडेट

    अमेरिकेने बेलारूसमधील दुतावास बंद केलं

  • 28 Feb 2022 06:32 PM (IST)

    भारतीय नागरिक दिल्लीत दाखल

  • 28 Feb 2022 06:31 PM (IST)

    क्रेनला औषधांसह इतर मदत पाठवणार : MEA प्रवक्ते अरिंदम बागची

  • 28 Feb 2022 05:07 PM (IST)

    तुमचे जीव वाचवा आणि निघून जा-युक्रेनचे रशियाला आवाहन

    "तुमचे जीव वाचवा आणि निघून जा" असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भाषणात रशियन सैनिकांना आवाहन केले -: रॉयटर्स

  • 28 Feb 2022 05:04 PM (IST)

    रशिया -युक्रेन चर्चेच्या टेबलावर

  • 28 Feb 2022 05:03 PM (IST)

    नाटोने युक्रेनला मदत वाढवली

    बलाढ्य रशियाचा सामना करण्यासाठी युक्रेनला नाटोकडून होणारी मदत वाढली आहे. युक्रेनला नाटोकडून शस्त्रपुरवठा करण्यात येत आहे. ज्यात मिसाईलचाही समावेश आहे.

    NATO partners are providing Ukraine with air-defence missiles and anti-tank weapons, NATO Chief Jens Stoltenberg said in a tweet today, adding that he had held another phone conversation with Ukraine's President earlier: Reuters

    — ANI (@ANI) February 28, 2022

  • 28 Feb 2022 04:51 PM (IST)

    विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याासाठी भारताची पोलंडशी चर्चा

    एस. जयशंकर यांचे ट्विट

  • 28 Feb 2022 04:16 PM (IST)

    रशियन सैनिकांचा शॉपिंग सेंटरवरही हल्ला

    युक्रेनच्या होरोडेन्का शहरात रशियन सैनिकांचा हल्ला

    हल्ल्यात इमारतींचं मोठं नुकसान

  • 28 Feb 2022 04:10 PM (IST)

    रशिया-युक्रेन चर्चेच्या लाईव्ह अपडेट

    1. युक्रेनच्या शिष्टमंडळात परराष्ट्र मंत्री आणि विदेश मंत्री 2. चर्चेआधी युक्रेनच्या रशियासमोर अटी 3. युक्रेनमदध्ये घुसलेले सैन्य मागे घ्या 4. राष्ट्राध्यक्ष झेलेंन्स्कींनी ठेवला प्रस्ताव 5. चर्चेआधी युद्धविरामाची घोषणा करा 6. युक्रेनमध्ये घुसलेल्या रशियाच्या सैन्यावर चर्चा होणार

  • 28 Feb 2022 04:01 PM (IST)

    रशिया-युक्रेन यांच्यात चर्चा सुरू

    युद्धातून मार्ग काढण्यासाठी रशिया-युक्रेनमध्ये चर्चा सुरू

  • 28 Feb 2022 03:23 PM (IST)

    पाच हजार सैनिक मारल्याचा युक्रेनचा दावा

  • 28 Feb 2022 03:23 PM (IST)

    रशिया-युक्रेन युद्धाची मोठी अपडेट

    खारकीव भागातील ट्रॅक्टर प्लांन्टजवळ मोठी आग

    गोळीबार केल्यानंतर मोठी आग

  • 28 Feb 2022 02:12 PM (IST)

    युक्रेन रशियामधील युद्ध थांबणार ?

    युक्रेन रशियामधील युद्ध थांबणार ?

    दुपारी अडीच वाजता दोन्ही देशांमध्ये होणार महत्त्वाची बैठक

    बेलारुस मध्ये दोन्ही देशांच शिष्टमंडळ दाखल

    बेलारूस मध्ये होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष

    रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये समझोता होणार का

  • 28 Feb 2022 01:49 PM (IST)

    रशिया -युक्रेनच्या चर्चेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात, बेलारूसमध्ये होणार चर्चा

    अखेर युद्धाच्या पाच दिवसानंतर दोनही देश चर्चेसाठी तयार झाले आहेत. रशिया आणि युक्रेनदरम्यान बेलारूसमध्ये चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर चर्चेसाठी जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती बेलारूस प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. या ठिकाणी लवकरच रशिया आणि युक्रेनदरम्यान बैठक पार पडणार आहे.

  • 28 Feb 2022 01:39 PM (IST)

    रशिया, युक्रेन युद्धात लात्व्हियाची उडी

    
    

    गेल्या पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आता या वादात लात्व्हियाने देखील उडी घेतली आहे. आज लात्व्हियाच्या संसदेत युद्धावर चर्चा करण्यात आली, त्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार लाटवियन नागरिकांना आपल्या इच्छेनुसार युक्रेनमध्ये लढण्यास जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

  • 28 Feb 2022 12:31 PM (IST)

    रशियन सैन्यांनी कारवाईची गती कमी केली, युक्रेनीयन सैन्याचा दावा

    रशियन सैन्यांनी कारवाईची गती कमी केली, युक्रेनीयन सैन्याचा दावा़

  • 28 Feb 2022 11:40 AM (IST)

    लवकरच होणार रशिया आणि युक्रेन मध्ये बैठक

    लवकरच होणार रशिया आणि युक्रेन मध्ये बैठक

    थोड्य़ाच वेळात होणार चर्चेला सुरवात

    बैठकीसाठी दोनही देश तयार

  • 28 Feb 2022 11:16 AM (IST)

    Russia Ukraine War : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवलेल्या उच्चस्तरीय बैठकीला सुरुवात

  • 28 Feb 2022 10:41 AM (IST)

    Russia Ukraine War : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली उच्चस्तरीय बैठक

    गेल्या पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान त्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देखील आज एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता या दोन बैठकींकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.

  • 28 Feb 2022 10:21 AM (IST)

    रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनच्या 352 जणांचा मृत्यू

    रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या पाच दिवसांपासून युद्ध सूरू आहे. या युद्धामध्ये मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दोनही कडील मनुष्यबळ मृत्यूमुखी पडले आहे. दरम्यान रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे एकूण 352 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या हल्ल्यांमध्ये एकूण 1,684 जण जखमी झाले आहेत. याबाबत युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती जारी करण्यात आली आहे.

  • 28 Feb 2022 09:48 AM (IST)

    युक्रेन- रशिया युद्धावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बोलावली बैठक

    युक्रेन- रशिया युद्धावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बोलावली बैठक

    नाटो आणि युरोपियन देश बैठकीत सहभागी होणार

    बायडन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्तवाचं

  • 28 Feb 2022 09:47 AM (IST)

    खेरसन, खारकीव प्रांतात रशियाकडून मिसाईल हल्ले

    युद्धाच्या पाचव्या दिवशीही रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. आज रशियाने युक्रेनच्या खेरसन आणि खारकीव प्रांतात पुन्हा हल्ले केले. रशियाने खेरसन आणि कारकीवमध्ये मिसाईल हल्ले केले. या मिसाईल हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात वित्त आणि  जीवितहानी झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीयन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातले असून, आर्थिक निर्बधांमुळे रशियाचे चलन असलेले रूबल' कोसळले डॉलरच्या तुलनेत रूबलमध्ये जवळपास तीस टक्क्यांची घट झाली आहे.

  • 28 Feb 2022 09:35 AM (IST)

    आर्थिक निर्बंधांचा परिणाम डॉलरच्या तुलनेत 'रूबल'मध्ये 30 टक्क्यांची घसरण

    युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. आर्थिक निर्बंध घातल्यानंतर रशियाचे चलन असलेल्या रूबलच्या किमतीत घसरण झाली असून, रूबल डॉलरच्या तुलनेत जवळपास तीस टक्क्यांनी घसरला आहे. रूबल किंमत प्रती डॉलर 114.33 इतकी झाली आहे.

  • 28 Feb 2022 08:45 AM (IST)

    युक्रेनला आर्थिक सुरक्षा प्रदान करू - ब्लिंकन

    रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अमेरिका आणि युक्रेनमध्ये चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये अमेरिकेकडून पराराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन तर युक्रेनच्या वतीने अर्थमंत्री सहभागी झाले होते. या चर्चेमध्ये अमेरिकेने युक्रेनला पाठिंबा दर्शवत आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचे अश्वासन दिले.

  • 28 Feb 2022 07:53 AM (IST)

    युक्रेनमध्ये अडकलेल्या 249 विद्यार्थ्यांना घेऊन पाचवे विमान बुखारेस्टमधून दिल्लीत दाखल

    युक्रेनमध्ये हजारे भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतामध्ये आणले जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहीमेंतर्गंत आतापर्यंत विमानाच्या पाच फेऱ्या करण्यात आल्या आहेत. आज बुखारेस्ट येथून पाचवे विमान 249 विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत दाखल झाले. या विद्यार्थ्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

  • 28 Feb 2022 06:34 AM (IST)

    रशियाच्या हल्ल्यात 16 विद्यार्थ्यांचा मृत्यू , युक्रेनच्या आरोग्य मंत्र्यांचा दावा

    युक्रेनमध्ये परिस्थिती गंभीर बनत असून, रशियाकडून हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी रशियाच्या हल्ल्यात  16 शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनचे आरोग्या मंत्री व्हिटर लिआश्को यांनी दिली.

Published On - Feb 28,2022 6:19 AM

Follow us
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.