AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं

'मित्रांनो मला माफ करा... मी मझ्या मुलांना संपवून स्वतःला संपवत आहे...', शिक्षकाने स्वतःच्या दोन मुलांसोबत गोदावरी नदीत कार घालून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस ठेवत शिक्षकाने वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. घडलेल्या प्रकरणानंतर सर्वत्र खळबळ माजाली आहे.

मित्रांनो मला माफ करा... पुणे गाव नदी... ब्रीज... व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्... शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं
Crime Nanded
| Updated on: Jul 17, 2026 | 1:14 PM
Share

समोर दिसणारी व्यक्ती उत्तम दिसत असली तरी, त्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे, हे ओळखणं फार कठीण असतं. असंच काही एका शिक्षकासोबत झालं आहे. अखेर वरिष्ठांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिक्षकाने स्वतःला तर संपवलंच, पण स्वतःच्या दोन निष्पाप मुलांचं आयुष्य देखील सोबतच संपवलं आहे. शिक्षकाने व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस ठेवत स्वतःचा आणि दोन मुलांचा अंत केला आहे. ‘मित्रांनो मला माफ करा… मी मझ्या मुलांना संपवून स्वतःला संपवत आहे…’, असं स्टेटस शिक्षकाने व्हॉटसअ‍ॅपवर ठेवल्याचं समोर येत आहे. शिक्षकाने गोदावरी नदीत स्वतःची कार टाकून आत्महत्या केली आहे. पोलीस आता याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

वरिष्ठांना जबाबदार ठरवून मुलांसह स्वतःच्या आयुष्याचा अंत करणाऱ्या शिक्षकाचं नाव सुनील मोरे असं आहे. सुनील मोरे हे मूळचे भोकर तालुक्यातील बेंबर गावचे राहणारे होते. तर पोटा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत मोरे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावर वरिष्ठांचा दबाव होता. अशात सुनील मोरे यांनी मुदखेड तालुक्यातील पुणेगाव परिसरातील आमदुरा घाटावरून कार गोदावरी नदीच्या पात्रात वेगाने टाकून टोकाचं पाऊल उचललं.

यामध्ये सुनील मोरे यांचं निधन झालं असून, मुलगी सारा आणि मुलगा सुमित याचा देखील मृत्यू झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, स्वतःचं आयुष्य संपवण्यापूर्वी सुनील मोरे यांनी व्हाट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवलेलं. त्या स्टेटसमध्ये त्यांनी हदगावचे गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्याकडून सतत होत असलेल्या मानसिक जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आहे… असं लिहिलं.

दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिघांना शोधण्यासाठी शोधकार्य सुरु केलं. अखेर ‘एसडीआरएफ’ (SDRF) च्या पथकाने अनेक प्रयत्नांनंतर नदीच्या पात्रातून कार बाहेर काढली. कार बाहेर काढल्यानंतर शिक्षक आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढले.

अखेर  या घटनेनंतर संबंधित व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात येईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय घडलेल्या घटनेमुळे शिक्षण वर्गात मोठी खळबळ उडाली असून सुनील मोरे यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Follow Us
नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम; ठाकरेंना डिवचण्यासाठी झळकले
नागपूरकरांचा गौरव... देवाभाऊंचा नवा विक्रम; उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठीच झळकले मुख्यमंत्री फडणवीसांचे होर्डिंग्ज
पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; तटकरेंनीच दिलं स्पष्टीकरण
Sunil Tatkare UNCUT | सुनेत्रा पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; अखेर सुनील तटकरे यांनीच दिलं मोठं स्पष्टीकरण
पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा टोला
Sanjay Raut | जयंत पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा खोचक टोला
राणांच्या दाव्यावर तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते..
Sunil Tatkare | रवी राणांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते...
महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद
Mahesh Tutorials | महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी
नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला
Nagpur | नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला, पुढील तपास सुरू
एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज...
Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज होणार खलबतं; काय घडतंय?
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र....
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे दिल्लीत तर सुनेत्रा पवार... त्या बड्या नेत्याने केला मोठा दावा
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक...

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य.

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

‘पेंद्या भाई’ दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला बाहेर, मध्यरात्री अघटित घडलं अन्….

‘पेंद्या भाई’ दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला बाहेर, मध्यरात्री अघटित घडलं अन्…

जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की! न्यायालयाचा आदेश डावलणे भोवले, शेतकऱ्याला आता तरी मोबदला मिळणार?.

जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की! न्यायालयाचा आदेश डावलणे भोवले, शेतकऱ्याला आता तरी मोबदला मिळणार?

मोठी दुर्घटना! भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; राज्यात खळबळ.

मोठी दुर्घटना! भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; राज्यात खळबळ

पुण्यातील बिल्डर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा, पोलीस उपायुक्तांनी नेमकं काय सांगितलं?.

पुण्यातील बिल्डर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा, पोलीस उपायुक्तांनी नेमकं काय सांगितलं?