वाढदिवसाची तयारी सुरु असतानाच तीन वर्षांचा चिमुकला टाकीत बुडाला

घरात वाढदिवसाची तयारी सुरु असताना तीन वर्षांचा अवधूत घराबाहेर खेळत होता. खेळता-खेळता तो उघड्या असलेल्या पाण्याच्या टाकीत पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला

वाढदिवसाची तयारी सुरु असतानाच तीन वर्षांचा चिमुकला टाकीत बुडाला

नाशिक : नाशिकमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्याचा वाढदिवशीच मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे अवधूत सचिन वाघ (Nashik Boy dies on Birthday) याला प्राण गमवावे लागले. घरात अवधूतच्या वाढदिवसाची तयारी सुरु असताना घडलेल्या या आक्रितामुळे वाघ कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

पालकांचं क्षणभराचं दुर्लक्ष चिमुकल्यांच्या जीवावर बेतू शकतं, याकडे लक्ष वेधणाऱ्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार रविवारी संध्याकाळी नाशिकच्या विहितगाव परिसरात घडला.

रविवारी अवधूतचा तिसरा वाढदिवस होता. घरात वाढदिवसाची तयारी सुरु असताना अवधूत घराबाहेर खेळत होता. खेळता-खेळता तो उघड्या असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेला आणि आतमध्ये पडला.

अवधूतला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पाण्याच्या टाकीत बुडाल्यानंतर अवधूतचा जागीच मृत्यू (Nashik Boy dies on Birthday) झाल्याची माहिती आहे.

पत्नीला मांडीत बसवून अभिनेत्याचं ड्रायव्हिंग, सहा जणांना उडवलं

अवधूत नेमका पाण्याच्या टाकीत कसा पडला, त्याला टाकीत पडताना कोणी पाहिलं नाही का, याचा शोध पोलिस घेत आहेत. अवधूतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

वाढदिवशीच चिमुकल्या अवधूतचा मृत्यू झाल्याने वाघ कुटुंबातील आनंदच हिरावला गेला आहे. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शेजाऱ्यांवरही शोककळा पसरली आहे. पालकांनी आपल्या चिमुकल्यांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *