नाशकात परतीच्या पावसानं थैमान, अनेक ठिकाणी वाहनं पाण्याखाली

नाशिकमध्ये परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे (Nashik Rain). आज (6 ऑक्टोबर) दुपारपासून नाशकात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरात पूरसदृश्य स्थिती उत्पन्न झाली आहे (Nashik Flood Situation). अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे.

नाशकात परतीच्या पावसानं थैमान, अनेक ठिकाणी वाहनं पाण्याखाली

नाशिक : नाशिकमध्ये परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे (Nashik Rain). आज (6 ऑक्टोबर) दुपारपासून नाशकात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरात पूरसदृश्य स्थिती उत्पन्न झाली आहे (Nashik Flood Situation). अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचंलं, अनेक ठिकाणी वाहनं पाण्याखाली गेली. नाशकातील रामकुंड, सीताकुंड हे पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे (Nashik Rain). पावसाने रौद्ररुप धारण केल्याने नाशिककरांचं जनजीवन पूर्णरणे विस्कळीत झालं आहे.

ढगांच्या गडगडाटासह नाशिकमध्ये मूसळधार पावसाला सूरुवात झाली (Nahsik Rain). शहरात दुपार तीन पासून तुफान पावसाला सुरुवात झाली. शहरातील दहिपूल, रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मण कुंड, अस्थी विसर्जन कुंड, सराफ बाजार तसेच हुंडीवाला लेन या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं.

नाशकातील जुने नाशिक, द्वारका, शालीमार, इंदिरानगरसह विविध परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. शहरातील सराफा बाजार भागातील रस्त्यांना तर नदीचं स्वरुप आलं. तसेच, अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलं.

मुसळधार पावसामुळे रस्त्याकडील झाडं रस्त्यावर उन्मळून पडली. पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली. तर शहरातील इतर नद्या-नालेही ओसंडून वाहत आहेत.

पावसामुळे कालिका यात्रेतील विक्रेत्यांसह भाविकांची तारांबळ उडाली. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने हजारो भाविक कालिका देवीच्या दर्शनासाठी आले होते, मात्र पावसामुळे अनेकजण अडकून पडले.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *