तिच्या बेडरुममध्ये CCTV लावले, दीर, सासरा मिळून…लव्ह मॅरेजमुळे तरुणीसोबत भयंकर प्रकार; महाराष्ट्र हादरला!
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात महिलेचा सासरच्या मंडळींकडून खूप छळ झाला. त्यानंतर पतीनेच तिला थेट विषारी औषध पाजले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर तो फरार झाला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या वाढत चालल्या आहेत. खासकरुन विवाहित महिलांवर सासरच्या मंडळींकडून होणारे अत्याचार वाढत आहेत. नुकताच पुण्यातील इंजिनीअर दीप्ती चौधरीने सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर आता नाशिकमधील एक प्रकरण समोर आले आहे. येथील एका महिलेना नवऱ्याने मारहाण केली आणि विषारी औषध पाजले. नंतर तिला रुग्णालयात दाखल करुन नवरा फरार झाला आहे. विवाहित महिलेच्या कुटुंबियांनी आता तक्रार दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील इंजिनीयर विवाहतेची घटना ताजी असताना नाशिकमध्ये उच्चशिक्षित विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबातील वादानंतर तिला काल घरी बोलावून मारहाण करत विषारी औषध बळजबरीने पाजून मारण्याचा प्रयत्न केल्याचा माहेरच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. महिमा मॉन्टी राजदेव असे पीडित विवाहितेच नाव आहे. एप्रिल 2025 मध्ये महिमाचा मॉन्टी राजदेवसोबत प्रेमविवाह झाला आहे. प्रेम विवाह केल्यामुळे सासरच्यांकडून महिमाची छळवणूक केली जात असल्याचा माहेरच्यांकडून आरोप करण्यात आला आहे.
माहेरच्या लोकांनी केली पोलिसात तक्रार
महिमा राजदेवचा विवाह झाल्यानंतर गेल्या आठ महिन्यापासून सासरे ,सासू आणि दिराकडून छळ सुरू असल्याचा आरोप आहे. चोरीच्या आरोपामुळे तिच्या घरातील बेडरूममध्ये देखील कॅमेरे लावल्याचा तिच्या आईकडून दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवऱ्याने महिमाला मारहाण करत विषारी औषध पाजून जिल्हा रुग्णात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला आहे. महिमा राजदेव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.
