AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhujbal on Loadshedding | डबल, टीबल भावाने वीज खरेदी सुरू, संकट दूर होईल; भुजबळांची ग्वाही

डबल, टीबल भावाने वीज खरेदी करत आहोत. त्यामुळे राज्यातील वीज संकट लवकरच दूर होईल, अशी ग्वाही गुरुवारी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे माध्यमांशी बोलताना दिली.

Bhujbal on Loadshedding | डबल, टीबल भावाने वीज खरेदी सुरू, संकट दूर होईल; भुजबळांची ग्वाही
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्रीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 14, 2022 | 12:49 PM
Share

नाशिकः डबल, टीबल भावाने वीज खरेदी करत आहोत. त्यामुळे राज्यातील वीज संकट लवकरच दूर होईल, अशी ग्वाही गुरुवारी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक येथे माध्यमांशी बोलताना दिली. भुजबळ म्हणाले की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यांनी हिंदू (Hindu) धर्मातील सामाजिक विषमतेतून सर्वसामान्यांना बाहेर काढण्याचे काम केले. या देशातील सर्व जणांना मार्ग दाखवला. हा आनंदाचा दिवस आहे. उत्साह असला तरी अशांततेचे गालबोट लागायला नको, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सत्र न्यायालय प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या यांना जामीन नाकारत आणि हे लपून बसतात. त्यानंतर ते हायकोर्टात गेले, पण कोर्टाने (Court) कारवाई करू नका, असे सांगितले नसल्याचे ते म्हणाले. पोलीस योग्य ती कारवाई करतीलच. फक्त न्याय व्यवस्थेच्या बाबतीत जनतेत शंका निर्माण नको व्हायला, बाबासाहेबांच्या कायद्याला तडा जायला नको यासाठी न्यायव्यवस्थेने काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

राज भेटीवर मौन सोडले

पंकज भुजबळ यांनी कालच शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांची सपत्नीक भेट घेतली होती. यावरही छगन भुजबळांनी मौन सोडले. ते म्हणाले, राज यांना नातू झाला म्हणून पेढ्यासहित पंकज यांनी सपत्नीक भेट घेतली. यात वावगे काही नाही. विरोधी पक्षातील लोकांना विरोधक मानतो, शत्रू मानत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. खरे तर राज ठाकरे यांच्या बदलेल्या भूमिकेवर छगन भुजबळ यांनी टीका केली होती. त्यानंतर ही भेट झाली. त्यामुळे ती विशेष चर्चेत होती. मात्र, या भेटीमागे कुठलेही राजकीय कारण नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.

बाबासाहेबांना अभिवादन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त नाशिक शहरातील शालिमार व नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रात्री 12 वाजता पुष्पहार अर्पण करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. तसेच राज्यातील जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मंत्री शोभाताई बच्छाव, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार देवयानी फरांदे,माजी आमदार वसंत गीते, शिवसेना उपनेते सुनील बागुल, माजी महापौर विनायक पांडे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, मनपा आयुक्त रमेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर, डॉ.शेफाली भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे आदी उपस्थित होते. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.