VIDEO: नाशिकचं ट्रान्सपोर्ट सिस्टिम कशी आहे, ज्याचं फडणवीस कौतूक करतायत?

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या ताब्यातील नाशिक महानगरपालिकेच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलंय.

VIDEO: नाशिकचं ट्रान्सपोर्ट सिस्टिम कशी आहे, ज्याचं फडणवीस कौतूक करतायत?


नाशिक : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या ताब्यातील नाशिक महानगरपालिकेच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलंय. पत्रकारांनी नाशिकमध्ये आला आहात, नाशिकला दिलेली आश्वासनं पूर्ण होताना दिसत आहे का? असा प्रश्न विचारला असता फडणवीसांनी नाशिकमध्ये अत्याधुनिक ट्रान्सपोर्टेशन व्यवस्था असल्याचं सांगितलं. तसेच या कामासाठी नाशिक महानगरपालिकेचं कौतुक केलं (Devendra Fadnavis praise transportation system of Nashik calling it modern).

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नाशिकमध्ये एक अतिशय अत्याधुनिक प्रकारची ट्रान्सपोर्टेशन व्यवस्था देतो आहोत याचा मला अतिशय आनंद आहे. यासाठी मी महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो. ही अत्यंत आधुनिक आणि स्वच्छ वाहतूक व्यवस्था आहे. ही व्यवस्था आणखी विकसित करावी लागेल. महापालिकेने केंद्र सरकारकडे 50 इलेक्ट्रिक बसेस मागितल्या आहेत. त्याही आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. न्यू मेट्रो आणि बस व्यवस्था याचं इंटिग्रेशन झाल्यानंतर नाशिकचं रुपांतर एका आधुनिक शहरात होईल. हे सगळं काम महानगरपालिका करते आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.”

“महाराष्ट्रातून 4 जणांना नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली. खाती देखील महाराष्ट्राला चांगली मिळाली. रावसाहेब पाटील आधी होते त्यांच्यासह नव्या मंत्र्यांना चांगली खाती मिळाली. बऱ्याच दिवसांनी महाराष्ट्राच्या वाट्याला चांगली खाती आली आहेत. याने महाराष्ट्राला फायदा होईल. आज नाशिकमध्ये असल्यानं डॉ. भारती पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो. या जिल्ह्याच्या सुपुत्रीला केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळाली. नाशिक जिल्ह्याला 50 वर्षांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालंय,” असंही त्यांनी नमूद केलं.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं शिवसेना-भाजप युतीची शक्यता मावळली? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

VIDEO: खडसे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात, फडणवीस त्यावर नेमकं काय म्हणाले?

‘भाजपमधून बाहेर पडाल तर काय त्रास होतो हे दाखवायचं आहे’, खडसेंच्या ईडी चौकशीवरुन भुजबळांचा भाजपवर वार

Devendra Fadnavis praise transportation system of Nashik calling it modern

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI