Thermoplastic Striping Solution | चिखलावर न्हाईचा उतारा! काय आहे थर्मोप्लास्टिक स्ट्रिपिंग, घ्या समजून

Thermoplastic Striping Solution | नेहमीच येतो पावसाळा, त्यात गारा म्हटल्यावर वाहनधारकांची तारंबळ उडते. त्यावर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उपाय शोधला आहे.

Thermoplastic Striping Solution | चिखलावर न्हाईचा उतारा! काय आहे थर्मोप्लास्टिक स्ट्रिपिंग, घ्या समजून
चिखलातून सूटका?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 1:42 PM

Thermoplastic Striping Solution | नेहमीच येतो पावसाळा, त्यात रस्त्यावर गारा म्हटल्यावर वाहनधारकांची (vehicle owners) तारंबळ उडते. नाशिकमध्ये तर वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Agra National Highway) गेल्यावर्षी चिखलामुळे (Due to Mud) अनेक वाहनधारकांना घसरगुंडीने इजा झाली होती. त्यावर आता उपाय शोधण्यात आला आहे. त्यासाठी दुभाजकांची उंची वाढवण्यात आली होती. पण हा उपाय ही तोकडा पडला. इतर ठिकाणी चिखल साचला. वाहनधारकांची समस्या कायम राहिली. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या चिखलावर उपाय योजना शोधलीच. वाहन धारकांच्या सततच्या तक्रारी तसेच राजकीय पक्षांचा प्रशासनावरील दबाव पाहता हा प्रयोग राबवण्यात येत आहे. त्यामुळे चिखलावर कायमस्वरुपी तोडगा निघतो का? का हा प्रयोगही पाण्यात जातो, हे लवकरच कळेल. मात्र वाहनधारकांची चिखल आणि खड्यातून सूटका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारी पातळीवर त्यासाठी उपाय योजना करण्यात येत असल्याने नाशिककरांना यंदाचा पावसाळा तरी सूखद जाईल अशी आशा करण्यात येत आहे.

वाहनांच्या लांबच लांब रांगा

यंदाच्या पावसाळ्यापूर्वी द्वारका ते स्वामिनारायण चौकापर्यंत दुभाजकांची उंची वाढविण्यात आली होती. त्यामुळे, या रस्त्यावर कुठेही चिखल न साचल्याने वाहने घसरल्याचे प्रकार घडले नाहीत. पण, वडाळा नाका ते द्वारका आणि जुना आडगाव नाक्याजवळ मात्र यंदा पुन्हा चिखल साचला आणि वाहनधारकांची तारांबळ उडाली. या ठिकाणी वाहने घसरून अपघात वाढले. वाहतूक कोंडी होऊन दीड-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाही लागल्या.

हे सुद्धा वाचा

काय आहे उपाय

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर गतवर्षी चिखलामुळे वाहने घसरल्याने त्या ठिकाणी दुभाजकाची उंची वाढविण्यात आली होती. पण इतर ठिकाणी चिखल साचल्याने यावर कायमस्वरुपी उपाय शोधण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच न्हाईने आता थर्मोप्लास्टिक स्ट्रिपिंग (जाड रंगाच्या पट्ट्या)चा उतारा शोधला आहे. यामुळे चिखल साचणार नाही. तसेच गाड्यांच्या चाकांना ग्रीप घेताना अडचण येणार नाही, असा अंदाज आहे. या तंत्रज्ञानाद्वारे वाहन घसरणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

ठिकाणं काढली हुडकून

चिखलामुळे ज्या ठिकाणी वाहनधारकांची घसरगुंडी उडते. ती ठिकाणी अगोदर शोधून काढण्यात आली आहे. ही घसरगुंडीची ठिकाणं अगोदर स्वच्छ करण्यात आली. त्यानंतर जेसीबीने ही जागा खरडवण्यात आली.पण हा उपाय न चालल्यानं ही घसरगुंडी थोपवण्यासाठी आता थेट थर्मोप्लास्टिक स्ट्रिपिंगचा पर्याय निवडण्यात आला आहे. वाहनसुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे ही उपाय योजना करण्यात येत आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित होण्याची चिन्हं आहेत. रस्त्यांना चर दिलेल्या ठिकाणी लवकरच थर्मोप्लास्टिक स्ट्रिपिंग करण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.