AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Rain Video : सप्तश्रृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस, 6 भाविक जखमी

Maharashtra Rain Update : सप्तश्रृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस

Nashik Rain Video : सप्तश्रृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस, 6 भाविक जखमी
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 10:45 AM
Share

नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील (Nashik Rain Update) सप्तश्रृंगी गड येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सप्तशृंगी गडावर गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे सप्तशृंगी मंदिरातील (Saptashrungi Fort Cloudy Rain) परतीच्या मार्गावरील संरक्षक भिंतीवरील दगड, माती वाहून आल्याने 4 भाविक आणि 2 लहान मुले खाली कोसळून गंभीर जखमी झाले आहेत. सप्तश्रृंगी देवस्थान संस्थानच्या दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये दोन महिला, दोन पुरूष व दोन लहान मुलांचा समावेश आहे. परतीच्या मार्गावरील डोंगरावरून मोठ्या प्रमाणावर पाऊस येत असल्याने या पाण्याचा जोर वाढला. हे पाणी संरक्षण भितीवरून मोठ्या प्रमाणात वाहू लागले आणि ही भिंत कोसळून पायरीवर मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागले. यावेळी भाविक हे पायरी उतरत असतांना पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पायरीवरुन वाहत गेले.

या घटनेत भाविकांच्या डोक्यावर व हात पायाला गंभीर इजा झाली. याबाबत देवी संस्थान चे कर्मचारी व स्थानिक व्यापारी यांना समजल्याबरोबर तातडीने भाविकांवर देवी संस्थानच्या दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. या घटनेत निंबाबाई नानु नाईक वय 45 रा. एंरडोल, अशिष तांरगे वय 23 रा.नागपुर, मनिष राऊत वय 32 रा.नागपूर, पल्लवी नाईक वय 3 रा. एरंडोल, शैला आव्हाड वय 7 यांना पुढील उपचारासाठी वणी येथे पाठविण्यात आले आहे. डॉ. धनश्री घोडके, निशा गायकवाड, कंपाउंडर शाताराम बेनके यांनी जखमींवर उपचार केले.

गोदावरी नदीलाही पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही गाड्यादेखील या पावसाच्या पाण्यात बुडाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकला येणारे पर्यटक गोदाघाट परिसरात आपली वाहनं पार्क करत असतात. त्यामुळे ही वाहनं पाण्याखाली जातात. सतर्कतेचा इशारा देऊनही अनेकजण गोदाघाट परिसरात आपल्या गाड्या पार्क करतात. त्यामुळे ही एक गाडी पाण्यात बुडाल्याचं पाहायला मिळतंय. तर काही झाडं पूर्ण पाण्याखाली गेली आहेत. काही झाडं अर्धी पाण्याखाली गेली आहेत.

या पावसाळ्यात पहिल्यांदाच गोदावरी नदीला पूर आला आहे. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणसाठ्यातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने गंगापूर धरण 65 टक्के भरलं आहे. काल धरणातून 10 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. परिणामी गोदावरीला यंदाच्या मोसमातील पहिला पूर आलाय. या पूरामुळे रामसेतू पूल पाण्याखाली गेला आहे. तर दुतोंडया मारुती माने पर्यंत बुडाला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.