Nashik : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिकचा गौरव; राजीव गांधी अभियानात पटकावला पुरस्कार

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात नाशिक जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नाशिकचा (Nashik) गौरव करण्यात आला. हा पुरस्कार नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला. रोख चार लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे (Award) स्वरूप आहे.

Nashik : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिकचा गौरव; राजीव गांधी अभियानात पटकावला पुरस्कार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुरस्कार स्वीकारला.
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 12:44 PM

मुंबईः राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात नाशिक जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नाशिकचा (Nashik) गौरव करण्यात आला. हा पुरस्कार नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला. रोख चार लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे (Award) स्वरूप आहे. या अभियानातील 18 पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, राज्यभरातील पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लालफीत, दफ्तरदिरंगाई या शब्दांना हद्दपार करत सर्वसामान्यांच्या सुखासाठी काम करताना राज्याच्या प्रगतीची गती कायम ठेवा, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

पुरस्कार कशासाठी दिला?

प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्याकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ हे अभियान राबविण्यात येते. या अभियानातंर्गत सहभाग तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना / उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देण्यात येतात.

कोणाला मिळाला पुरस्कार?

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अंतर्गत मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावर विजय वाघमारे ( सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणारे प्रस्ताव या वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार दीपेंन्द्र सिंह कुशवाहा (मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, मुंबई) यांना मिळाले. पारितोषिकाचे स्वरुप रोख दहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे. द्वितीय पुरस्कार राहुल व्दिवेदी प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप रोख सहा लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे. तृतीय पुरस्कार राधाकृष्ण गमे (विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप रोख चार लाख रुपये सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे.

विभागीय स्तरांवरही गौरव

विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार मनोज पाटील(पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप रोख दहा लाख रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे. द्वितीय पुरस्कार अनिरूध्द बक्षी (उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप रोख सहा लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे. तृतीय पुरस्कार एस. एस.शेवाळे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती, राहता, अहमदनगर) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप रोख चार लाख रुपये,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे.

महापालिका वर्गवारीमध्ये सन्मान

महापालिका वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार राजेश पाटील(आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप रोख दहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे. द्वितीय पुरस्कार राधाकृष्ण बी.(आयुक्त, नागपूर महानगरपालिका) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप रोख सहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे. तृतीय पुरस्कार दिलीप ढोले (आयुक्त, मीरा भाईंदर महानगरपालिका) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप रोख चार लाख रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे.

सर्वोत्कृष्ट कल्पना

सर्वोकृष्ट कल्पना अंतर्गत शासकीय संस्था वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार गिरीश वखारे (तहसीलदार, तहसील कार्यालय, तळोदा, नंदुरबार) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे. द्वितीय पुरस्कार मंदार कुलकर्णी (तहसीलदार, तहसील कार्यालय, नवापूर, नंदुरबार) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे. तृतीय पुरस्कार नीमा अरोरा (जिल्हाधिकारी, अकोला) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप रोख वीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे.

शासकीय अधिकारी

शासकीय अधिकारी वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार डॉ. राजेंद्र बी. भोसले (जिल्हाधिकारी, अहमदनगर) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे. द्वितीय पुरस्कार अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी, जळगाव) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे. तृतीय पुरस्कार एकनाथ बिजवे (नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप रोख वीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे.

शासकीय कर्मचारी

शासकीय कर्मचारी वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार अजय राजाराम लोखंडे (कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, भडगाव नगरपरिषद, भडगाव, जळगाव) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे. द्वितीय पुरस्कार निशिकांत सूर्यकांत पाटील (तलाठी, पारोळा शहर, तलाठी कार्यालय पारोळा, जळगाव) यांना मिळाला. या पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.