AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Road Show : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो, तुफान गर्दी; प्रचंड शक्तीप्रदर्शन करत काळाराम मंदिरात

PM Narendra Modi Nashik Visit Today रोड शोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथील ऐतिहासीक काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहेत. काळाराम मंदिराच्या परिसरात आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ढोलताशा आणि लेझीम पथक प्रदर्शन करीत आहे.  27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

PM Modi Road Show : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो, तुफान गर्दी; प्रचंड शक्तीप्रदर्शन करत काळाराम मंदिरात
पंतप्रधान मोदी यांचा रोड शोImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jan 12, 2024 | 12:03 PM
Share

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Road Show) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या रोड शोला सुरूवात झालेली आहे. नाशिककरांनी पंतप्रधानांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे. संपूर्ण नाशिक नगरी ही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजवण्यात आलेली आहे. सध्या पंतप्रधानांचा रोड शो सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे देखील मोदींसोबत त्यांच्या गाडीत स्वार झालेले आहेत. पंतप्रधान मोदी हात उंचावून उपस्थितांना अभिवादन करताना दिसत आहे.

रोड शोनंतर घेणार काळाराम मंदिराचे दर्शन

रोड शोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथील ऐतिहासीक काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहेत. काळाराम मंदिराच्या परिसरात आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ढोलताशा आणि लेझीम पथक प्रदर्शन करीत आहे.  27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने नाशिक मध्ये नरेंद्र मोदी यांचा रोड शो, त्याचप्रमाणे रामकुंड येथे गोदा आरती करण्याचे देखील नियोजन आहे. नरेंद्र मोदी हे रामकुंड या परिसरात येणार असल्याने रामकुंडाला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलीय.

त्याचप्रमाणे विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसराचे महत्त्व वाढले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान रामकुंड या ठिकाणी येत असल्याने, याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

चोख सुरक्षा व्यवस्था

देशभरातून या महोत्सवासाठी तरुण तरुणांनी गर्दी केलेली आहे या सगळ्यांची सध्या चेकिंग सुरू आहे. एकेक करून पोलीस या सगळ्यांना आज सोडत आहेत. तर दुसरीकडे 15 फुटांचा भव्य दिव्य असा व्यासपीठ उभारण्यात आलेला आहे, जवळपास डझनभर मंत्री केंद्रीय आणि राज्यातले मंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. फुलांची आरस संपूर्ण व्यासपीठाला करण्यात आलेली आहे भव्य दिव्य एलईडी स्क्रीन लावण्यात आलेले आहे डॉल्बी स्पीकर लावून या ठिकाणी वीस हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था एका पॅंडाॅलमध्ये करण्यात आलेली आहे.

आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने त्यांच्या स्वप्नातला भारत कसा होता कसा आहे याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावरून मांडतील.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.